Maithili Thakur: मुंबईच्या प्रचारात गायिका व भाजप आमदार मैथिली ठाकूर यांची एंट्री, म्हणाल्या, "मी उत्तर भारतीय असले तरी..."

12 Jan 2026 17:25:51



 Maithili Thakur


मुंबई : (Maithili Thakur) बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून, विविध क्षेत्रातील मान्यवर राजकीय प्रचारात सक्रिय झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध गायिका, बिहारच्या आमदार आणि भाजप स्टार प्रचारक मैथिली ठाकूर या मुंबई दौऱ्यावर असून, मुंबईतील दहिसर वॉर्ड क्रमांक १ मध्ये प्रचारादरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. (Maithili Thakur)
 

माध्यमांशी संवाद साधताना मैथिली ठाकूर म्हणाल्या, “मी उत्तर भारतीय असले तरी मराठीच आहे.” मुंबईच्या राजकारणात मराठी अस्मिता आणि भाषेचा मुद्दा महत्त्वाचा असल्याच्या प्रश्नावर त्यांनी हे स्पष्ट मत मांडले. एका पत्रकाराने मुंबईच्या राजकारणात मराठीचा मुद्दा नेहमीच केंद्रस्थानी असतो, असे सांगितल्यानंतर मैथिली ठाकूर यांनी हे उत्तर दिले. (Maithili Thakur)
 

हेही वाचा :  Ravindra Chavan viral video : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि इम्तियाज जलील प्रकरणाचा खुलासा, व्हायरल व्हिडिओमागचे सत्य काय?

 

मैथिली ठाकूर म्हणाल्या की, “लोकांना जोडायचं आहे, विकास करायचा आहे आणि तेही कोणत्याही अडचणीशिवाय,”. समाजात दरी निर्माण न करता सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे हाच विकासाचा खरा मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी एक मराठी गाणे देखील गाऊन दाखवले. (Maithili Thakur)
 
मैथिली ठाकूर या प्रसिद्ध गायिका असून, २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत, अलीनगर विधानसभा मतदारसंघातून अनुभवी नेते विनोद मिश्रा यांचा पराभव करून निवडून आल्या.राजकारणात एण्ट्री करण्यापूर्वी मैथिली ठाकूर या एक लोकप्रिय गायिका आहेत. रिअॅलिटी शोजमधून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यांचे शो हे जगभरात होताना दिसतात. आता त्या महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात देखील सामील झाल्या आहेत.
 

 
 
 

 

Powered By Sangraha 9.0