Mumbai Local : मुंबईकरांचा लोकल प्रवास सुखावतोय!

12 Jan 2026 19:55:11
Mumbai Local
 
मुंबई : (Mumbai Local) मुंबईकरांच्या रोजच्या जखमेवर मलम लावणारी, पण याआधी कुणी धाडस न केलेली घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवली आहे. “लोकल मेट्रोसारखी होईल, पण तिकीट आहेत तेवढंच राहील” या एका वाक्यातच मुंबईकरांच्या हिताची घोषणा त्यांनी केली आहे.(Mumbai Local)
 
गर्दी, घाम, धक्काबुक्की आणि जीवघेणा प्रवास अनुभवणाऱ्या मुंबईकरांसाठी ही केवळ सुविधा नसून, राजकीय इच्छाशक्तीचा ठोस पुरावा मानला जात आहे. स्वयंचलित दरवाज्यांसह वातानुकूलित लोकल आणि तेही तिकीट दरवाढ न करता घेतलेला हा निर्णय म्हणजे “मुंबईकरांचा कर वाया जात नाही” हे सांगणारा स्पष्ट संदेश आहे.(Mumbai Local)
 
केंद्राचा पैसा, राज्याची दिशा
 
यावर्षी केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी २ लाख ५२ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून, त्यातील २३,७७८ कोटी रुपये थेट महाराष्ट्रासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. विशेषतः मुंबई लोकल सेवा बळकट करण्यासाठी बोरीवली–विरार, कुर्ला–सीएसएमटी, पनवेल–कर्जत अशा ३०१ किमीच्या नवीन मार्गिका उभारल्या जात आहेत.(Mumbai Local)
 
या प्रकल्पांमुळे केवळ ट्रॅक वाढणार नाहीत, तर मुंबईकरांचा वेळेवर घरी पोहोचण्याचा हक्क मजबूत होणार आहे. सध्या दिवसाला ३ हजार लोकल फेऱ्या धावतात; लवकरच ३०० अतिरिक्त फेऱ्या सुरू होणार आहेत, म्हणजेच गर्दीवर थेट वार आहे. या प्रकल्पांसाठी कोट्यवधींची गुंतवणूक मंजूर झाली असून यामुळे उपनगरी रेल्वेचा चेहरामोहरा बदलणार आहे. ही आकडेवारी नाही तर राजकीय प्राधान्यक्रमाची घोषणा आहे.(Mumbai Local)
 
हेही वाचा : Nitesh Rane: अदानी मुद्द्यावर नितेश राणेंचा राज ठाकरेंवर पलटवार; म्हणाले, “मुंबईकरांनी सावध राहावे” 
 
‘एमयूटीपी’मधून मुंबईला नवे इंजिन
 
मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (MUTP) अंतर्गत
  
एमयूटीपी-II : ८,०८७ कोटी
 
एमयूटीपी-III : १०,९४७ कोटी
 
एमयूटीपी-IIIA : ३३,६९० कोटी
 
‘मेक इन इंडिया’वर एसी लोकल
 
महामुंबईतील सर्व लोकल (Mumbai Local) वातानुकूलित करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. २,८५६ एसी डबे खरेदीसाठी तब्बल २१ हजार कोटींची निविदा याच महिन्यात जाहीर होणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच कोणत्याही बहुराष्ट्रीय वित्त संस्थेच्या कर्जाशिवाय ही एसी लोकल तयार होणार आहे. राज्य आणि केंद्र सरकार प्रत्येकी १०,५०० कोटींची गुंतवणूक करत असून, मेक इन इंडिया अंतर्गत भारतातच लोकलची बांधणी होणार आहे. हा निर्णय म्हणजे विकासासोबतच आत्मनिर्भरतेचा राजकीय संदेश आहे.(Mumbai Local)
 
मुंबईकरांसाठी संदेश स्पष्ट
 
देवेंद्र फडणवीस सरकारने या निर्णयांमधून एक गोष्ट स्पष्ट केली आहे. मुंबई केवळ महसूल देणारी नाही, तर दर्जेदार सुविधा मिळवण्याचा हक्क असलेले महानगर आहे. एसी लोकल, वाढीव फेऱ्या, नवे ट्रॅक आणि तिकीट दरवाढ शून्य यामुळे मुंबईकरांचा प्रवास केवळ बदलत नाही, तर राजकारणालाही नवा ट्रॅक मिळतो आहे.(Mumbai Local)
 
 
Powered By Sangraha 9.0