मुंबई : (ISRO PSLV-C62 Mission) भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने (ISRO) सोमवारी डीआरडीओच्या ईओएस-एन वन म्हणजेच 'अन्वेषा' या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे प्रक्षेपण केले. हे प्रक्षेपण आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी १० वाजून १७ मिनिटांना पीएसएलव्ही-सी62 रॉकेटद्वारे करण्यात आले. या मोहिमेदरम्यान तिसऱ्या टप्प्यात काही तांत्रिक अडचण आल्याची माहिती समोर आली आहे.(ISRO PSLV-C62 Mission)
इस्रोने पोलारसॅटेलाईट लाँच व्हेइकल (PSLV C62) या रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक समस्या निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. 'अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाईट' (EOS) सह इतर १४ उपग्रहांना अवकाशात स्थापित करण्यासाठी ही मोहिम राबवण्यात आली होती. दरम्यान या मोहिमेत काही तांत्रिक अडचण आल्याचे इस्त्रोचे अध्यक्ष व्ही. नारायण यांनी सांगितले.
(ISRO PSLV-C62 Mission)
पीएस-3 स्टेज दरम्यान काही त्रुटी आढळल्या आहेत. इस्रोने या घटनेची सखोल तपासणी सुरू केली असल्याची माहिती दिली आहे. "पीएसएलव्ही-सी62 या प्रक्षेपकाचा तिसरा टप्पा बंद होताना तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे अपेक्षित उंचीवर असतांना मार्गात काही बदल झाला. आम्ही उपलब्ध माहितीचे विश्लेषण करत आहोत. लवकर अपडेटसह पुन्हा माहिती देऊ", असे इस्रोचो प्रमुख व्ही. नारायण यांनी सांगितले.(ISRO PSLV-C62 Mission)