India-Germany Relations : भारत–जर्मनी संबंधांच्या नवा अध्यायाला सुरुवात! पंतप्रधान मोदी - जर्मन चॅन्सलर मर्झ यांच्या बैठकीत महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या

12 Jan 2026 15:12:06

India-Germany Relations

नवी दिल्ली : (India-Germany Relations)
जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ सोमवार दि. १२ जानेवारीपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. गुजरातमधील अहमदाबाद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साबरमती आश्रमात त्यांचे स्वागत केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यानंतर ते दोघेही साबरमती नदीकाठावर आयोजित आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात सहभागी झाले.(India-Germany Relations)

भारत–जर्मनी प्रतिनिधिमंडळ स्तरीय चर्चा

गांधीनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मन चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्यात उच्चस्तरीय बैठक पार पडली. यानंतर भारत आणि जर्मनीने संरक्षण, व्यापार आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील विस्तृत उपक्रमांची घोषणा केली आहे, ज्यामुळे द्विपक्षीय संबंधांमध्ये एका नवीन अध्यायाला सुरूवात झाली आहे. संरक्षण औद्योगिक सहकार्य मजबूत करण्यासाठी, दोन्ही देशांनी सह-विकास आणि सह-उत्पादनावर लक्ष केंद्रित करणाऱ्या घोषणापत्रावर स्वाक्षरी केली.(India-Germany Relations)

बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना दिलेल्या संयुक्त निवेदनात पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, भारत–जर्मनी संबंध संपूर्ण मानवतेसाठी महत्त्वाचे आहेत. वाढता व्यापार आणि गुंतवणूक यामुळे दोन्ही देशांच्या रणनैतिक भागीदारीला नवी ऊर्जा मिळाली आहे. यंदा भारत–जर्मनी राजनैतिक संबंधांची ७५ वर्षे साजरी होत असून, गेल्या वर्षी सामरिक भागीदारीची २५ वर्षे पूर्ण झाली. हे टप्पे केवळ कालावधी दर्शवत नाहीत, तर सामाईक महत्त्वाकांक्षा, परस्पर विश्वास आणि सातत्याने बळकट होत जाणाऱ्या सहकार्याचे प्रतीक असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.(India-Germany Relations)


Powered By Sangraha 9.0