नवी दिल्ली: (I-PAC Raid Controversy) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, डीजीपी राजीव कुमार आणि पोलिस आयुक्त मनोज कुमार यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारी याचिका अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.(I-PAC Raid Controversy)
आय-पीएसी चौकशीत अडथळा आणल्याचा आरोपईडीच्या याचिकेत असा आरोप केला आहे की, गुरुवारी तृणमूल काँग्रेसची राजकीय सल्लागार कंपनी आय-पीएसीच्या कार्यालयात आणि त्यांच्या संचालकांच्या घरांवर केलेल्या झडतीदरम्यान राज्य सरकारने अडथळे निर्माण केले. याच प्रक्रियेत ईडीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक ती मुभा मिळाली नसल्याचा दावा याचिकेत केला गेला आहे. राज्य यंत्रणेने पुरावे नष्ट केले आणि छेडछाड केली. कायद्याचे रक्षकही या गुन्ह्यात सहभागी झाले, असे ईडीच्या याचिकेत म्हटले आहे.
(I-PAC Raid Controversy)
सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत ईडीने म्हटले आहे की, राज्य अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याच्या तपास यंत्रणेच्या अधिकारात अडथळा आणला. ईडीने सीबीआय चौकशीची मागणीही केली आहे. तसेच कोलकाता उच्च न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, राज्य सरकारने आपल्या यंत्रणेचा वापर करून कोर्टरूममध्ये गोंधळ निर्माण केला, ज्यामुळे न्यायाधीशांना सुनावणी पुढे ढकलावी लागली, असा दावाही ईडीने केला आहे.
(I-PAC Raid Controversy)