नागपूर : (Chandrashekhar Bawankule) काँग्रेस पक्ष हा लाडक्या बहिणींच्या विरोधात असून त्यांचे धोरण महिलाविरोधी आहे, अशी टीका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली.
माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, "कर्नाटकमध्ये लाडकी बहीण योजना बंद झाली. महाराष्ट्रातही त्यांनी प्रयत्न केला. पण न्यायालयाने त्यांना हकलून दिले. काँग्रेसचे धोरण महिलाविरोधी आहे. त्यांनी कधीही लाडक्या बहिणीला साथ दिली नाही. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ शकत नाही. लाडकी बहीण योजना आजची नाही. ती नियमित सुरु असलेली योजना असून त्यामुळे आचारसंहितेचा भंग होत नाही. त्यामुळे निवडणूक आयोग ही योजना बंद करणार नाही, असा मला विश्वास आहे." (Chandrashekhar Bawankule)
हेही वाचा : BMC Election : मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याबाबत
विकासावर बोलले तरच मतदान मिळते
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना भावनिक बोलून जनतेच्या मनात संभ्रम तयार करून मतदान प्रक्रियेत विकासाचा अजेंडा बाजूला करायचा आहे. परंतू, त्यांच्या प्रचाराची भूमिका चुकत आहे, हे मी वारंवार सांगतो. त्यांनी या पद्धतीने अनेकदा मते मागितली पण काहीही मिळाले नाही. आता विकासावर बोलले तरच मतदान मिळते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष किंचित किंचित होत आहे. त्यांची प्रचाराची दिशा, विषय चुकत असल्याने निवडणूकीत त्यांच्या पक्षाची अधोगती पाहायला मिळेल. मुंबई तोडणार आहे, असे ते प्रत्येकवेळी बोलतात. त्यांचे काहीही लोक ऐकत नाहीत. जनतेने अडीच वर्षे आदित्य आणि उद्धव या दोघांनाही बघितले आहे. त्यामुळे त्यांनी विकासावर बोलू नये. पोकळ गोष्टी करून लोकांना भरकटवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मराठवाडा आणि विदर्भात मोदीजी आणि फडणवीस यांच्या योजनांकरिता मते मिळणार आहेत. विदर्भात आम्हाला सर्व ठिकाणी यश मिळेल तर काँग्रेस पक्ष किंचित होणार आहे," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले. (Chandrashekhar Bawankule)