National Youth Day : युवा दिनानिमित्त अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा

12 Jan 2026 17:10:07
National Youth Day
 
ठाणे : (National Youth Day) राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा परिषद ठाणे येथे अभिवादन कार्यक्रमाचे (National Youth Day) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.(National Youth Day)
 
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने हा दिवस राष्ट्रीय युवा दिन (National Youth Day) म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात समाजात वाढत चाललेल्या अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा घेतली. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक नुकसान लक्षात घेता, नशामुक्त समाजनिर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.(National Youth Day)
 
हेही वाचा : BMC Election : मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याबाबत 
 
या प्रसंगी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालकल्याण विभाग) संजय बागुल, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार, समाज कल्याण विभाग प्रमुख उज्वला सपकाळे, उपमुख्य व लेखा वित्त अधिकारी अंजली अंबेकर, सहाय्यक गट विकास अधिकारी (ग्रामपंचायत) पंडित राठोड यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(National Youth Day)
 
कार्यक्रमाच्या शेवटी नशामुक्त, निरोगी व सक्षम भारत घडविण्यासाठी सर्वांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प करण्यात आला.(National Youth Day)
 
 
Powered By Sangraha 9.0