मुंबई : बिगबॉसचं घर म्हणजे काहीतरी हटके आणि धमाकेदार असणारच. बिगबॉस मराठीचं ६ वं पर्व आता सुरु झालं आहे. आणि घरसुद्धा तितकंच हटके पाहायला मिळत आहे. या घरात गार्डन एरिया, बाल्कनी, प्रशस्त लिव्हिंग रूम, किचन, वॉशरूम परिसर, बेडरूम, कॅप्टन रूम यांसह जिम आणि स्विमिंग पूलसाठी स्वतंत्र जागा देण्यात आली आहे. म्हणजेच, एका आलिशान रिसॉर्टसारखं हे घर दिसत असलं तरी, आत शिरल्यावर शांतता टिकेल याची शाश्वती मात्र अजिबातच नाही. पाहा या आलिशान घराचे सुंदर फोटोज.
संपूर्ण होमटूर व्हिडीओ इथे पाहा.
गार्डन एरिया
स्विमिंग पूल
लिव्हिंग रुम 
किचन रुम


डायनिंग एरिया
वॉशरुम 
बेडरुम 

कॅप्टन रुम 

दरम्यान, ११ जानेवारीपासून ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन सुरू झाला आहे. तेव्हा घराचं दार उघडताच कोणते नवे ट्विस्ट, कोणते वाद आणि किती ड्रामा रंगणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. अभिनेता रितेश देशमुख पुन्हा एकदा शोचं सूत्रसंचालन करताना दिसणार असून, हा शो दररोज रात्री 8 वाजता प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.