Chhatrapati Shivaji Maharaj Terminus : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर प्रवाशांसाठी ‘रिलॅक्स झोन’

12 Jan 2026 18:42:25
Chhatrapati Shivaji Maharaj Terminus

मुंबई : (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) धावपळीच्या जीवनात रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे थोडा निवांत श्वास घेण्याची संधी मिळणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि महसूलवाढीच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण पाऊल उचलत येथे अत्याधुनिक ‘रिलॅक्स झोन’ सुरू केला आहे.(Chhatrapati Shivaji Maharaj Terminus)
 
भाडे-व्यतिरिक्त उत्पन्न (नॉन-फेअर रेव्हेन्यू) वाढवण्यासाठी मध्य रेल्वेने हाती घेतलेल्या अभिनव उपक्रमांतर्गत हा ‘रिलॅक्स झोन’ साकारण्यात आला असून, यामुळे प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होत आहेत, तसेच रेल्वेच्या महसुलातही सकारात्मक भर पडत आहे.(Chhatrapati Shivaji Maharaj Terminus)
 
क्विक रेस्ट या संस्थेद्वारे व्यवस्थापित करण्यात येणाऱ्या या रिलॅक्स झोनमध्ये अत्याधुनिक मसाज तंत्रज्ञानाने सुसज्ज संपूर्ण शरीरासाठीच्या मसाज खुर्च्या बसविण्यात आल्या आहेत. दीर्घ प्रवासामुळे होणारा थकवा, स्नायूंवरील ताण आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी ही सुविधा विशेष उपयुक्त ठरणार आहे. प्रवासापूर्वी किंवा प्रवासानंतर काही मिनिटांचा आराम मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.(Chhatrapati Shivaji Maharaj Terminus)
 
हेही वाचा : Stray Dog Row :"रुग्णालयात भटके कुत्रे आले तर वावगं काय?", असं म्हणणाऱ्या शर्मिला टागोरांना न्यायालयानं फटकारलं!  
 
रिलॅक्स झोनमध्ये स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरणाची विशेष काळजी घेण्यात आली असून, आरामदायी आसन व्यवस्था प्रवाशांना सुखद अनुभव देणारी आहे. विशेष म्हणजे, या सेवेचे दर सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे ठेवण्यात आले असून, मसाज सत्रांची सुरुवात फक्त ९९ रुपयांपासून करण्यात आली आहे.(Chhatrapati Shivaji Maharaj Terminus)
 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) हा रिलॅक्स झोन मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचा आणखी एक प्रवासी-केंद्रित उपक्रम ठरत असून, स्थानकांवरील सुविधा जागतिक दर्जाच्या करण्यासाठी भारतीय रेल्वेने सुरू ठेवलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे उत्तम उदाहरण आहे. प्रवाशांच्या गरजांचा विचार करून राबविण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांमुळे रेल्वे प्रवास अधिक सुखकर आणि आधुनिक बनत आहे.(Chhatrapati Shivaji Maharaj Terminus)
 
रिलॅक्स झोनची वैशिष्ट्ये
 
अत्याधुनिक तंत्रज्ञानासह संपूर्ण शरीरासाठी मसाज खुर्च्या
आरामदायी आणि स्वच्छ आसन व्यवस्था
आरोग्यदायी व सुरक्षित वातावरण
रु. ९९ पासून सुरू होणारी जलद आणि परवडणारी मसाज सत्रे
 
  
Powered By Sangraha 9.0