Navnath Ban : विकासाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य पुढे नेत आहेत : नवनाथ बन

11 Jan 2026 17:52:13
 Navnath Ban
 
मुंबई : (Navnath Ban) "व्हिजन आणि विकासाच्या माध्यमातून राज्याला पुढे घेऊन जाण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केलं जात आहे. याउलट संजय राऊत यांनी त्यांच्या खासदार निधीतून केलेले एक काम दाखवावे मी हजार रुपये बक्षीस देतो.२५ वर्षे झाले ते खासदार आहेत त्यांचा फंड नेमका कुणाला विकला जातो याच उत्तर त्यांनी द्याव." अशी प्रतिक्रिया भाजपा माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी रविवार दि.११ रोजी दिली. (Navnath Ban)
 
"आपली मुंबई खड्यात घालण्याच काम उबाठा आणि संजय राऊत यांनी केलं आहे.याउलट बिडीडी चाळ, कोस्टल रोड, अटल सेतू ,अभ्युदय नगर पुनर्विकास असे प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गतीने मार्गस्थ आहेत. याउलट कुठ नेवून ठेवलं होत कार शेड आणि मेट्रो हा आमचा प्रश्न राऊत यांना आहे.कायद्या सुव्यवस्थेबाबत बोलायचं असेल तर अडीच वर्ष मविआ सरकार असताना वाझे काय लादेन आहे का ? असा सवाल तुम्हीच विचारत होता. वाझे सारख्या आरोपीची पाठराखण मविआ सरकारच्या काळात केली गेली हे राज्याने बघितले आहे." असेही बन म्हणाले. (Navnath Ban)
 
हेही वाचा : Devendra Fadnavis: लाडकी बहीण योजनेतल्या हप्त्याला काँग्रेसचा विरोध
 
"आम्ही नागरी सुविधांवरच निवडणुका लढतोय उलट उबाठा गट हिरव्या मतांसाठी काय काय करतो आहे हे राज्याने बघितले आहे.आमचा अजेंडा राज्यातील प्रत्येक नागरिकाला सुविधा पुरवणे हा आहे. नमाज पठण स्पर्धा ,अजाण स्पर्धा ठेवणे हा उबाठाचा अजेंडा आहे.पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा तुमच्या रॅलीत दिल्या जातात हे देखील महाराष्ट्र बघतो आहे.तुमचा अजेंडा पाकिस्तानधार्जिणा आहे." असेही बन यांनी स्पष्ट केले. (Navnath Ban)
 
"जोगेश्वरीमध्ये उबाठाच्या रॅलीत बॉम्बस्फोटातील दोषी फिरवला गेला.ज्या रशीद मामू ने छत्रपती संभाजीनगर या नामांतरला विरोध केला. त्याचा पाहुणचार मातोश्रीवर बोलवून केला गेला.हे कशाच लक्षण आहे हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवावे आणि लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे बंद करावेत." असेही बन यांनी स्पष्ट केले. (Navnath Ban)
 
" एम आय एम सोबत भाजपाने कधीही युती केली नाही. उलट उबाठाचे मुस्लिम लीगशी साटलोट आहे.मुस्लिम लीगप्रमाणेच उबाठा भूमिका घेताना दिसते. सर्जिकल स्ट्राइक झाले तेव्हा पुरावे मागितले गेले. ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून पहलगाममधील दहशतवाद्यांना कंठस्नान घातल गेल.तेव्हा दहशतवादी जिवंत आहेत म्हणणारे संजय राऊत होते." अशी प्रतिक्रिया बन यांनी दिली. (Navnath Ban) 
 
 
Powered By Sangraha 9.0