Narendra Modi: द्वेष, अत्याचार आणि दहशतीचा क्रूर इतिहास जाणीवपूर्वक लपवण्यात आला

11 Jan 2026 16:32:25
 
Narendra Modi
 
मुंबई : (Narendra Modi) देशातील काही इतिहासकार आणि राजकारण्यांनी वसाहतवादी मानसिकतेतून द्वेष, अत्याचार आणि दहशतीचा क्रूर इतिहास जाणीवपूर्वक लपवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. गुजरातच्या सोमनाथ येथे सोमनाथ मंदिरावर झालेल्या पहिल्या आक्रमणाला हजार वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी शौर्य यात्रेच्या समारोपप्रसंगी पंतप्रधान बोलत होते. (Narendra Modi)
 
ते म्हणाले की, देशाच्या दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतरही वसाहतवादी मानसिकतेच्या लोकांनी आपला गौरवशाली भूतकाळ आणि इतिहास पुसून टाकण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. सोमनाथ मंदिरासाठी लढणाऱ्यांना त्यांची योग्य ओळख आणि महत्त्व दिले गेले नाही. काही इतिहासकार आणि राजकारण्यांनी या आक्रमकांचा इतिहास स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये आपल्याला शिकवले की, सोमनाथ मंदिराचा खजिना लुटण्यासाठी मंदिर पाडण्यात आले. आक्रमकांच्या दहशतीचा क्रूर इतिहास आपल्यापासून लपवण्यात आला होता. (Narendra Modi)
 
हेही वाचा : स्वयंसेवकांवर बंधुत्वाने मायेची पखरण करणारे ‘भास्करभाऊ’
 
ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर जेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराचे नूतनीकरण करण्याचे वचन दिले तेव्हा त्यांना तसे करण्यापासून रोखण्यात आले. १९५१ मध्ये राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या मंदिर भेटीदरम्यानही आक्षेप घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ज्या शक्तींनी त्यावेळी पटेलांना मंदिराचे नूतनीकरण करायला विरोध केला होता त्या अजूनही सक्रिय आहेत, फक्त त्या आता भारताविरुद्ध तलवारीऐवजी छुपे कट रचत आहेत. (Narendra Modi)
 
फूट पाडणाऱ्या प्रत्येक शक्तीला पराभूत करण्याची गरज 
 
आपल्याला इथून पुढे अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. आपल्याला स्वतःला बळकट करण्याची आणि एकजूट राहण्याची गरज आहे. आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक शक्तीला पराभूत करण्याची गरज आहे. १०२६ मध्ये गझनीच्या महमूदने सोमनाथ मंदिरावर केलेल्या पहिल्या हल्ल्यापासून ते आजपर्यंतचा १००० वर्षांचा प्रवास आपल्याला पुढील १००० वर्षांसाठी तयार राहण्याची प्रेरणा देईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. (Narendra Modi)
 
हेही वाचा : कहाणी अमेरिकन दंडेलशाहीची! 
 
"भारतात सोमनाथसारखी हजारो पवित्र स्थळे आहेत जी हजारो वर्षे जुनी आहेत. ही स्थळे आपल्या शक्तीचे आणि परंपरेचे प्रतीक आहेत. परंतु दुर्दैवाने गुलाम मानसिकतेच्या लोकांनी यापासून स्वतःला दूर करण्याचा प्रयत्न केला. तो इतिहास विसरला जावा यासाठी घृणास्पद प्रयत्न केले गेले." (Narendra Modi)
 
 
Powered By Sangraha 9.0