मुंबई : (Ladki Bahin Yojana) राज्यातील लाडकी बहीण योजनेविषयी मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात १४ आणि १५ जानेवारी रोजी डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्यांचा एकत्रित ३,००० रुपयांचा हप्ता जमा होणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या हप्त्याला काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतल्याने या निधी वितरणाला तात्पुरता ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Ladki Bahin Yojana)
राज्यात १५ जानेवारी रोजी महापालिकांसाठी मतदान होणार असून सध्या आचारसंहिता लागू आहे. अशा परिस्थितीत मकर संक्रांतीचे निमित्त पुढे करून लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करणे म्हणजे महिला मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवून आक्षेप नोंदवला आहे. निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होऊ नये यासाठी महापालिका निवडणुकीनंतरच या योजनेचा निधी वितरित करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. (Ladki Bahin Yojana)
हेही वाचा : Palika Election: मतदानाची शपथ घेत मतदार जनजागृती सायकल रॅली
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचा निधी एकत्रित देण्याचा निर्णय सरकारकडून घेतला गेला होता. १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधून हा निधी थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, मतदानाच्या अगदी एक दिवस आधी निधी वितरण होणार असल्याने निवडणूक आचारसंहितेचा भंग होत असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. (Ladki Bahin Yojana)
दरम्यान, काँग्रेसच्या या भूमिकेवर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर लाडक्या बहिणींचा द्वेष करत असल्याचा आरोप केला करत, लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून काँग्रेसचा या योजनेविरोधात सातत्याने विरोध राहिला असून यापूर्वी नागपूर हायकोर्टातही योजनेविरोधात याचिका दाखल करण्यात आल्याची आठवण त्यांनी करून दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार संक्रांतीच्या सणानिमित्त लाडक्या बहिणींना आर्थिक दिलासा देत असल्याने काँग्रेस अस्वस्थ असल्याच बावनकुळे म्हणाले. (Ladki Bahin Yojana)