मुंबई : (Devendra Fadnavis) लाडकी बहीण योजनेतल्या हप्त्याला काँग्रेसने विरोध केला असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच कमिटीचे सरचिटणीस ॲड. संदेश कोडविलकर यांनी तसे पत्र राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना शनिवार दि.१० रोजी पाठवले आहे. (Devendra Fadnavis)
डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ महिन्यातील लाडकी बहीण योजना हप्त्याची रक्कम महापालिका निवडणूक मतदानाच्या आधी देण्याचा राज्य सरकारचा मानस असून यामुळे १ कोटीहून अधिक महिला मतदारांना ही बाब प्रभावित करेल असे यात म्हटले आहे.ही एकप्रकारे सामूहिक लाच असून आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे ही रक्कम निवडणूक संपल्यावरच देण्यात यावी असाही उल्लेख केला आहे. (Devendra Fadnavis)
हेही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यावर वाद: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा आक्षेप, नेमकं प्रकरण काय?
यावर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,"आमचे विरोधक पहिल्या दिवसापासून लाडक्या बहिण योजनेचा विरोध करत आहेत.योजना सुरू केली तेव्हा ते उच्च न्यायालयात गेले. ही ऑन गोइंग योजना आहे त्यामुळे थांबवता येत नाही.त्यांनी कितीही पत्र लिहिले तरी त्यातून त्यांच्या मनातील लाडक्या बहिणीबद्दलच विषच बाहेर येईल पण लाडक्या बहिणीचे पैसे थांबणार नाहीत." (Devendra Fadnavis)
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर टीका करताना आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की,"आमच्या माता भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद काँग्रेसला व काँग्रेस नेत्यांना बघवत नाही. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींबद्दलचा द्वेष काँग्रेसमध्ये ठासून भरला आहे. तो वरचेवर उफाळून येतो. नात्यात विष कालवणारी ही काँग्रेसची जहरी विचारधारा, आता सर्वांसमोर आली आहे.आम्ही काँग्रेसच्या विकृत कृतीचा निषेध करीत आहोत. काँग्रेसला या राज्यातील आमच्या माता- भगिनी कधीही माफ करणार नाहीत." (Devendra Fadnavis)