मुंबई : (BMC Election) बी एम सी महापालिका ही मुंबईच्या लोकांचं भविष्य ठरवणारी काम करण्यासाठी असते. विशेषता नागरिकांचे आरोग्य आणि शिक्षण या महत्त्वाच्या गरजा जर दुर्लक्षित झाल्या तर त्याचा परिणाम दीर्घकाळ न्हवे तर पिढ्यान् पिढ्या भोगावा लागतो.आज मुंबईत बी एम सी अंतर्गत दवाखान्यात जी गैरसोय होते यातून हा निष्काळजीपणा लोकांच्या आर्थिक आणि कौटुंबिक जीवनावर विपरीत परिणाम करीत असतो. (BMC Election)
मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या म्युनिसिपल हॉस्पिटलमध्ये तपासणी कमी खर्चात होते पण लिहून दिलेली औषधे अन् इंजेक्शन खाजगी दुकानांतून आणावी लागतात इतका तुटवडा आहे.मुळात अशा ठिकाणी येणाऱ्या गरीब आणि गरजू रुग्णांकडे इतके पैसे नसतात.बऱ्याच ठिकाणी एक्सरे मशीन बंद अवस्थेत आहेत. मुंबईतील पालिका दवाखान्यात फक्त १३००० बेड आहेत.पण रुग्णांची संख्या दरवर्षी २५ लाख इतकी असते. दरवर्षी तीन लाख ऑपरेशन होतात. बी एम सी हॉस्पिटलची ओ पी डी दरवर्षी दोन कोटी अकरा लाखांची असते.ही तफावत किती मोठी आहे.हा ताण दहा वर्ष झाली आहे.जशी सुविधा खाजगी दवाखान्यात मिळते तशी पालिका दवाखान्यात का मिळत नाही.हवा तो कंत्राटदार मिळावा म्हणून पालिका रुग्णालयात एम आर आय मशीनसाठी निविदा पुन्हा काढली जाते. (BMC Election)
हेही वाचा : Navnath Ban : विकासाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य पुढे नेत आहेत : नवनाथ बन
बी एम सी च्या मराठी शाळा जवळपास लोप पावायला लागलेल्या आहेत.ज्या शाळेत खुद्द बाळासाहेब ठाकरे शिकले होते आणि पू ल देशपांडे शिक्षक होते त्या ओरिएंट हाय स्कूल म्हणजेच आजची दादर विद्या मंदिर,माहीम येथे आठवी पासून मुले शोधायला संघर्ष करावा लागतो अशी माहिती तेथील एका निवृत्त शिक्षकाने दिली.मराठी शाळांची पटसंख्या ७० टक्यांपेक्षा कमी झाली.धोकादायक म्हणून सी वन केटगरीतील तोडलेल्या मराठी शाळांवर पुन्हा मराठी शाळाच उभ्या राहिल्या पाहिजेत यासाठी किती प्रयत्न झाले.तसेच स्पेशल नीड असलेल्या दिव्यांग, गतिमंद मुलांसाठी कोणतीही स्पेशल शाळा बी एम सी पालिकेच्या वतीने चालवली जाते का असाही प्रश्न आहेच.या मुलांची संख्या वाढली तर तसे शिक्षण देणाऱ्या पालिकेच्या शाळा तेवढ्या प्रमाणात आहेत का. यासर्वाची उत्तर सामान्य मुंबईकर गेली २५ वर्ष सत्तेत असलेल्या उबाठा ला विचारत आहे. (BMC Election)
महायुतीच्या रविवार दिनांक ११ रोजी प्रसिद्ध झालेल्या वचननाम्यात शिक्षणाने सक्षम मुंबई अंतर्गत महापालिका अंतर्गत सर्व शाळात AI लॅब्स आणि शाळांचे स्तर आंतरराष्ट्रीय मानकांपर्यंत उंचावण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. (BMC Election)
आरोग्याच्या बाबत महापालिका रुग्णालयांचा दर्जा एम्स च्या धर्तीवर सुधारणार तसेच मुंबईकर हेल्थ कार्ड अंतर्गत नागरिकांचा वैद्यकीय इतिहास डीजिटल स्वरूपात जतन करणार, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पूर्णपणे कार्यक्षम करणार.आणि मुंबईत वैद्यकीय शिक्षण क्षमता दुप्पट करण्यावर भर दिला गेला आहे. (BMC Election)