भारतात जन्म घेणे हे आपले सौभाग्य आहे - शांताक्का जी

10 Jan 2026 14:49:18
Shantakka Ji
 
मुंबई : ( Shantakka Ji ) ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाची काळजी घेतली पाहिजे, कारण समाजाच्या कल्याणाने आपलेच कल्याण होते. समाज आणि आपण एकमेकांना पूरक आहोत ही भावना फक्त आपल्याच देशात आहे. त्यामुळेच भारतात जन्म घेणे हे आपले सौभाग्य आहे, असे मत राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांतक्का यांनी व्यक्त केले.
 
मध्य प्रदेशच्या जबलपूर येथे समितीच्या जबलपूर महानगरातर्फे महाराणी लक्ष्मीबाई शाळेच्या मैदानावर मकर संक्रांती उत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी शांताक्का बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, शाखा हे वैयक्तिक विकासाचे मूलभूत एकक आहे. वैयक्तिक विकासामुळे समाज निर्माण होतो आणि असा विकसित समाज राष्ट्र निर्माण करतो.
 
हेही वाचा : Mumbai News : मुंबईत भयंकर दुर्घटना! गोरेगावमध्ये फ्रिजच्या स्फोटातून भीषण आग; वडीलांसह दोन मुलांचा होरपळून मृत्यू
 
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून निवृत्त लेफ्टनंट कर्नल हिमांशी सिंह यांनी राष्ट्रनिर्माण, सांस्कृतिक जतन आणि कर्तव्याची भावना याबद्दल विचार मांडले. त्या म्हणाल्या की, राष्ट्र सेविका समितीच्या कार्याचे कौतुक केले त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी असल्याने त्या म्हणाल्या की, संघ ही केवळ एक संघटना नाही तर राष्ट्रनिर्माणासाठी एक पवित्र वेदी आहे.
 
सनातन संस्कृतीवर बोलताना त्या म्हणाल्या की, सनातन हे एक असे शास्त्र आहे जे संपूर्ण विश्वाला एक कुटुंब मानते. जगात जेव्हा जेव्हा अंधार पसरला आहे तेव्हा भारताने ज्ञान आणि संस्कृतीच्या आधारे सूर्यासारखे तेजस्वी मार्गदर्शन केले आहे. जर आपण आपल्या भारतीय मूल्यांपासून दूर झालो तर समाज कमकुवत होईल. त्यामुळे भारतीय मूल्ये जपायला हवीत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने स्वयंसेवक तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
 
Powered By Sangraha 9.0