मुंबई : (Palika Election 2026) महाराष्ट्रात सध्या २९ महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, या निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे, तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात चार दिवसांची दारूबंदी लागू करण्यात आली आहे. (Palika Election 2026)
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून दारूची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर १४ जानेवारी, मतदानाचा दिवस असलेला १५ जानेवारी आणि निकालाचा दिवस १६ जानेवारी या तिन्ही दिवशी पूर्ण वेळ दारूबंदी राहणार आहे. (Palika Election 2026)
हेही वाचा : Stock market : रविवारीही शेअर मार्केट खुला राहण्याची शक्यता!
या कालावधीत देशी-विदेशी दारूची दुकाने, वाईन शॉप्स तसेच बार पूर्णपणे बंद राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले असून, शांततेत व पारदर्शकपणे मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. (Palika Election 2026)