मुंबई : (Megablock Updates) मुंबईकरांना रविवार दि. ११ जानेवारी रोजी रेल्वे प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर नियोजित मेगाब्लॉकमुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही स्थानकांवर लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. (Megablock Updates)
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते विद्याविहार दरम्यान सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ या वेळेत मेगाब्लॉक ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड आणि विद्याविहार या स्थानकांवर लोकल गाड्या थांबणार नाहीत. (Megablock Updates)
हेही वाचा : Palika Election 2026: महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यात ४ दिवस दारूबंदी
तसेच, ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे–वाशी–नेरुळ दरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या वेळेत लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा लागणार आहे. (Megablock Updates)
दरम्यान, पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरिवली दरम्यान मेगाब्लॉक असल्याने अप मार्गावर ७९ आणि डाऊन मार्गावर ७४ अशा एकूण १५३ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. याचा मोठा परिणाम पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांवर होण्याची शक्यता आहे. (Megablock Updates)