मुंबई : (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या एका प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत खोचक टोला लगावला. “उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सभेत विकासावर एक तरी वाक्य बोलून दाखवावं. मी त्यांना ३ हजार रुपये देतो. मागच्या सभेत मी एक हजार रुपये सांगितले होते, पण त्यावरही काही प्रतिसाद आला नाही. आता थेट ३ हजार देतो,” असे फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis)
हेही वाचा : Palika Election 2026: महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यात ४ दिवस दारूबंदी
अंधेरी आणि चेंबूर येथील प्रचारसभांमध्ये बोलताना फडणवीस म्हणाले, “गेल्या पंचवीस वर्षांत उद्धव ठाकरे यांनी मुंबईत केलेले एक तरी ठोस विकासकाम दाखवावं. ते दाखवले, तर मी ३ हजार रुपये देईन.” तसेच मराठीचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या काळात मुंबईकरांना मुंबईबाहेर का जावं लागलं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (Devendra Fadnavis)