Devendra Fadnavis : धारावीतील एकाही पात्र झोपडपट्टीवासीयाला बाहेर फेकले जाणार नाही: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

10 Jan 2026 19:55:05
 
Devendra Fadnavis
 
मुंबई : (Devendra Fadnavis) बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० जानेवारी रोजी धारावी येथे भव्य प्रचारसभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी धारावी पुनर्विकासाबाबत मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा करत धारावीकरांना दिलासा दिला. “धारावीतील एकाही पात्र झोपडपट्टीवासीयाला बाहेर फेकले जाणार नाही. सर्व पात्र नागरिकांना धारावीमध्येच पुन्हा घर दिले जाईल,” असे ठाम आश्वासन त्यांनी दिले. (Devendra Fadnavis)
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, धारावी पुनर्विकास प्रकल्प हा कोणत्याही खासगी व्यक्तीला दिलेला नसून तो एसआरए (Slum Rehabilitation Authority) अंतर्गत राबवला जात आहे. या प्रकल्पात राज्य सरकार स्वतः हिस्सेदार आहे. त्यामुळे “कोणीही धारावी लाटू शकत नाही,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली धारावीचा पुनर्विकास पारदर्शक पद्धतीने होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Devendra Fadnavis)
 
हेही वाचा :  Ajit Doval: “ऑटोपायलटवर असला तरी भारत विकसितच होणार”
 
धारावीतील पारंपरिक व्यवसायांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, मातीच्या भांड्यांचा व्यवसाय करणारे कुंभार समाज तसेच चामड्याच्या उद्योगाशी संबंधित व्यावसायिकांचे धारावीमध्येच पुनर्वसन केले जाईल. यासोबतच या व्यवसायांना पाच वर्षांची करमुक्ती देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. यामुळे धारावीतील लघुउद्योग आणि स्थानिक रोजगार टिकून राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Devendra Fadnavis)
 
या सभेत फडणवीस यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली. धारावीच्या नावावर भीती पसरवली जात असल्याचा आरोप करत त्यांनी स्पष्ट केले की, धारावीतील उद्योग, रोजगार आणि स्थानिक समाजरचना कायम राहील. (Devendra Fadnavis)
 
 
Powered By Sangraha 9.0