Asaduddin Owaisi: “हिजाब घालणारी मुलगी भारताची पंतप्रधान बनेल”: असदुद्दीन ओवैसी

10 Jan 2026 16:10:16
 
Asaduddin Owaisi
 
सोलापूर: (Asaduddin Owaisi) सोलापुरातील एका प्रचारसभेत एमआयएमचे प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केलेल्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे. “हिजाब परिधान करणारी एक मुलगी भविष्यात भारताची पंतप्रधान बनेल,” असे वक्तव्य ओवैसी यांनी केले. (Asaduddin Owaisi)
 
ओवैसी म्हणाले की, पाकिस्तानच्या संविधानात केवळ एका विशिष्ट धर्माचा व्यक्तीच पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानानुसार कोणताही भारतीय नागरिक देशाचा पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो. “आपण कदाचित पंतप्रधान होऊ शकणार नाही, पण एक हिजाब घालणारी मुलगी या देशाची पंतप्रधान बनेल, इंशाअल्लाह,” असेही त्यांनी सांगितले. (Asaduddin Owaisi)
 
हेही वाचा :  Devendra Fadnavis : “विकासावर एक वाक्य बोला, ३ हजार देईन”: मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
 
दरम्यान, ओवैसींच्या या विधानावर भाजप नेते अनिल बोंडे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी ओवैसींच्या वक्तव्यावर टीका करताना म्हटले की, “कट्टर इस्लामिक देश मानल्या जाणाऱ्या इराणमध्ये महिला हिजाब काढून टाकत आहेत. अनेक मुस्लिम महिलांनाही आता हिजाब नको असून त्या पारतंत्र्य नाकारत आहेत.” बोंडे यांनी ओवैसींच्या विधानाला ‘अर्धसत्य’ ठरवत भारतातील लोकसंख्येचे संतुलन बदलत असल्याचा दावा केला आणि मुस्लिम लोकसंख्या वाढत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. (Asaduddin Owaisi)
 
या पार्श्वभूमीवर, बोंडे यांनी हिंदूंना एकजूट होण्याचे आवाहन केले. ओवैसींच्या वक्तव्यामुळे राज्यात आणि देशभरात संविधान, धर्मनिरपेक्षता आणि महिला स्वातंत्र्य यावर पुन्हा एकदा राजकीय वादाला तोंड फुटले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्यावर अधिक आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Asaduddin Owaisi)
 
 
Powered By Sangraha 9.0