पुणे : ( ₹29 Lakh Job Scam in Pimpri-Chinchwad ) सायबर भामट्यांनी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणाला २९ लाखांचा गंडा घातला आहे. पिंपरी - चिंचवडमधील तरुणासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
पिंपरी - चिंचवड शहरातील रहिवासी असलेल्या २७ वर्षीय हर्षल जामोदकर या तरुणाची २९ लाख १६ हजार ४७२ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. नामांकित कंपनीत 'सिनीअर सॉफ्टवेअर इंजिनिअर' नोकरी देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी ही फसवणूक केली.
हेही वाचा : Asaduddin Owaisi: “हिजाब घालणारी मुलगी भारताची पंतप्रधान बनेल”: असदुद्दीन ओवैसी
'अश्विनी सिंघानिया' नावाचा वापर करून एका अज्ञात व्यक्तीने हर्षलशी संपर्क साधला होता. हर्षलचा विश्वास संपादन केल्यानंतर चोरट्यांनी नोकरी आणि कंपनीमधील तांत्रिक कारणांचा बनाव रचला. यानंतर चोरट्यांने नवीन खाते उघडणे, एफ-६ फॉर्म फी, किट अक्टिव्हेशन आणि सिक्युरिटी क्लिअरन्स अशा वेगवेगव्व्या नावाखाली हर्षलला ऑनलाइन पैसे भरण्यास भाग पाडले.
५ मे ते ६ ऑक्टोबर २०२५ या सहा महिन्यांच्या काळात चोरट्यांनी विविध स्वरूपात हर्षलकडून तब्बल २९ लाखांची रक्कम उकळली. वारंवार पेसे भरूनही नोकरी मिळत नसल्याचे लक्षात येताच हर्षलने तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. आता पोलिसांनीही या सायबर चोरट्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.