Zohran Mamdani : कुराणवर हात ठेवत जोहरान ममदानींनी घेतली महापौरपदाची शपथ

    01-Jan-2026   
Total Views |
 
Zohraan Mamdani
 
मुंबई : (Zohran Mamdani) भारतीय वंशाचे जोहरान ममदानी न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम महापौर बनले आहेत. त्यांनी गुरुवारी कुराणवर हात ठेवून पदाची शपथ घेतली. आतापर्यंत न्यूयॉर्क शहराचे बहुतेक महापौर बायबलवर हात ठेवून शपथ घेत होते. न्यू यॉर्क शहराच्या महापौरांनी इस्लामच्या पवित्र ग्रंथावर हात ठेवून शपथ घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. तथापि, अमेरिकेच्या संविधानानुसार शपथ घेण्यासाठी कोणत्याही धार्मिक ग्रंथाचा वापर अनिवार्य नाही.(Zohran Mamdani)
 
३४ वर्षीय ममदानी (Zohran Mamdani) हे न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम, पहिले दक्षिण आशियाई आणि आफ्रिकेत जन्मलेले पहिले महापौर आहेत.ममदानी यांनी न्यूयॉर्कच्या सिटी हॉलखाली असलेल्या एका बंद सबवे स्टेशनमध्ये शपथ घेतली. हा एक खाजगी समारंभ होता, ज्यात ममदानी यांचे कुटुंब उपस्थित होते. त्यानंतर दुपारी एक सार्वजनिक शपथविधी समारंभ होईल. ममदानी (Zohran Mamdani)यांनी दोन कुराणवर हात ठेवून शपथ घेतली.(Zohran Mamdani)

यापैकी एक त्यांच्या आजोबांचे कुराण होते आणि दुसरे खिशात ठेवता येणारे छोटे कुराण होते. पॉकेट साईज कुराण १८ व्या शतकाच्या अखेरीस किंवा १९ व्या शतकातील असल्याचे सांगितले जात आहे. हे कुराण न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररीच्या शॉम्बर्ग सेंटर फॉर रिसर्च इन ब्लॅक कल्चरच्या संग्रहाचा भाग आहे.(Zohran Mamdani)

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\