मुंबई : (Thackeray brothers) मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत यावेळी एक विचित्र आणि बोलका राजकीय चित्रपट पाहायला मिळतो आहे. या चित्रपटाच्या एका भागात मनसे आणि उबाठा गटाची ऐतिहासिक युती झाली असली तरी, उद्धव ठाकरे यांनी आपले बंधू राज ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून दिली असे म्हणावे लागेल. (Thackeray brothers)
यावेळी मुंबई महापालिकेची निवडणूक विविध युत्या, आघाड्या, रुसवे-फुगवे, रडारड, गोंधळ या सगळ्यांनी गाजत असून या निवडणूकीत ठाकरे बंधूंची युती हा एक चर्चेचा विषय आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Thackeray brothers) यांचे मराठीच्या मुद्यावरून एकत्र येणे आणि त्यानंतर एकत्रित निवडणूका लढवण्याची घोषणा करणे यामुळे हे दोन्ही मराठीचे कैवारी मुंबईत समसमान जागा लढवून आपली ताकद दाखवतील, असे वाटत होते. परंतू, उद्धव ठाकरे यांनी अतिशय हुशारीने ५३ जागांवर मनसेची बोळवण केली. (Thackeray brothers)
याऊलट, मुंबईत संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांचे जाळे आणि हिंदुत्वाची मते नसतानाही आम आदमी पक्ष, वंचित बहुजन आघाडी यांसारखे पक्ष मनसेपेक्षा अधिक जागा लढवत आहेत. मात्र, स्वतःला ‘मराठी माणसाचा आवाज’ म्हणवणाऱ्या मनसेच्या वाट्याला केवळ ५३ जागा देऊन त्यांची गळचेपी करण्यात आली का? असा प्रश्न उपस्थित होतो. या निवडणूकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचीही युती झाली. यात काँग्रेसने वंचितला तब्बल ६२ जागा दिल्या. त्यातील अनेक जागांवर तर वंचितकडे देण्यासाठी उमेदवारच नाहीत. तरीही त्यांनी ६२ जागा लढवण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे, मनसेच्या तुलनेत मुंबईत आम आदमी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद फारच कमी. मात्र, असे असतानाही हे दोन्ही पक्ष मनसेपेक्षा अधिक जागा लढवत आहेत. (Thackeray brothers)
गेल्या काही वर्षांत मुंबईत मनसेची ताकद चढ-उताराची राहिली असली, तरी आजही मनसे निवडणूकीत उतरल्यावर मराठी मतांवर परिणाम होऊ शकतो, हे उद्धव ठाकरे ओळखून आहेत. त्यामुळेच ते मनसेच्या पदरात ५३ जागा टाकून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसते. आम आदमी पक्ष, वंचित बहुजन आघाडी यांसारखे मुंबईत जास्त प्रभाव नसलेले पक्ष जर मनसेपेक्षा अधिक जागा लढवत असतील, तर ५३ जागांची ‘ऑफर’ ही युती नसून ती अपमानाची पावती म्हणावी लागेल. मुंबईत मराठी मतांचे नेतृत्व कोण करणार? या प्रश्नाचे उत्तर मतदार देतीलच. परंतू, सध्या उद्धव ठाकरेंना विरोधकांची नाही, तर मनसेचीच भीती आहे, असे म्हणावे लागेल. (Thackeray brothers)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....