मुंबई : (Switzerland Bar Blast) स्वित्झर्लंडमधील क्रांस मोंटाना (Crans-Montana) शहरात एका स्की रिसॉर्टमधील बारमध्ये नववर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या स्फोटात अनेक जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून मोठ्या प्रमाणात नागरिक जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार ०१:३० वाजता (००:३० जीएमटी) कॉन्स्टेलेशन बारमध्ये हा स्फोट झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नवीन वर्षाचे सेलीब्रेशन सुरू असताना बारमध्ये आग लागल्याचे दिसत आहे. मात्र या व्हिडीओची अद्याप सत्यता तपासण्यात आलेली नाही. दरम्यान या घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांसाठी एक हेल्पलाईन सुरू करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
स्वीस न्यूज आऊटलेट Blick ने दिलेल्या वृत्तानुसार, नवीन वर्षाच्या निमित्ताने आयोजित कॉन्सर्टवेळी करण्यात आलेल्या आतिषबाजीमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्वीस पोलिसांनी मात्र आगीचे कारण अद्याप समोर आले नसल्याचे म्हटले आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\