मुंबई : मुंबई महापालिका ही केवळ नागरी संस्था नाही, तर ती राजकीय शक्तीचा केंद्रबिंदू सुद्धा आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून तिला ओळखले जाते. याच महापालिकेवर 25 वर्षे शिवसेनेचा भगवा फडकत होता. मधल्या काळात उद्धव ठाकरेंनी सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेसच्या सेक्युलर राजकारणाशी जुळवून घेत शिवसेनेच्या मूळ हिंदुत्ववादी भूमिकेला मवाळ केले. त्यामुळे ’हिंदुत्वाशी तडजोड करणारे उद्धव ठाकरे’ असा बऱ्याचदा त्यांच्याविरोधात आरोप झाले. मात्र आज पाहिले तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी, ठाकरे गट आपला बालेकिल्ला गमावण्याच्या स्थितीत असल्याचे दिसते आहे. मुंबईतील हिंदू मध्यमवर्गाचा भावनिक दुरावा, हे त्यामागचे मोठे कारण आहे.
मध्यमवगय हिंदू सोसायट्या, मुंबईतील मराठी मतदार अशा काही घटकांमध्ये हिंदुत्वाचा प्रभाव निर्णायक आहे. भाजपने याच मुद्द्यावर शहरात लाउडस्पीकर, बेकायदेशीर घुसखोरी, ड्रग्स, दहशतवाद, मालवणी-मुंब्रा येथील वाढते अतिक्रमण अशा विविध विषयांत आक्रमक भूमिका घेतली. ठाकरे गट मात्र आपण धर्मनिरपेक्ष असल्याच्या भूमिकेत अडकलेला दिसतो. त्यामुळे मुस्लिम मतदार काँग्रेसकडे वळताना दिसतात, हिंदू मध्यमवर्ग भाजपकडे वळताना दिसतो आणि शिवसेनेचे पारंपरिक मराठी मतदार मात्र संभ्रमात अडकलेले दिसतात.
हेही वाचा : Thackeray brothers: जागावाटपात मनसेचे इंजिन मागे; उद्धव ठाकरेंना बंधूंचीच भीती?
अनेक प्रसंगात ठोस भूमिका घेणे टाळले
पालघर साधु हत्याकांडाचा मुद्दा मुंबईतील हिंदू मतदारांच्या मनात अजूनही आहे. 2019 नंतर ठाकरेंनी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून सरकार स्थापन केले; त्यामुळे ज्या काँग्रेसने राम मंदिर आणि कलम 370 हटवण्याला विरोध केला, त्या पक्षासोबत जाणे म्हणजे हिंदुत्वाशी तडजोड असे आरोप ठाकरेंवर होऊ लागले.
उद्धव ठाकरे यांनी अयोध्या भेट दिली असली तरी, त्यांच्या सरकारकडून राम मंदिर, काशी, मथुरा आदी मुद्द्यांवर भूमिका कधीच घेतली गेली नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनिप्रदूषणावर कारवाई होणे आवश्यक असतानाही, ठाकरे सरकारच्या काळात मशिदींवरील अवैध भोंगे हटवण्यावर ठोस कारवाई झाली नाही.
बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोहीम राबवली नाही. त्यामुळे ’हिंदुत्वाशी तडजोड करणारे उद्धव ठाकरे’ असा आरोप वारंवार झाला आहे.
हे वाचलात का ?: Chandrashekhar Bawankule : नाराज कार्यकर्त्यांशी चर्चा करून अर्ज मागे घेतले जातील: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
’यांना’ उमेदवारी देऊन नेमके काय साधले?
1) चंगेज मुलतानी : काँग्रेसचे माजी नगरसेवक चंगेज मुलतानी यांनी नुकताच आपल्या मुलासह ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाने झीशान चंगेज मुलतानी यास प्रभाग क्र. 62 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. हे तेच चंगेज मुलतानी आहेत ज्यांच्याविरोधात ’बलात्काऱ्यांना आसरा देणारा चेहरा’ म्हणून यापूव अनेकदा आरोप झाले आहेत.
2) रशीद मामू : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशिद खान तथा रशीद मामू यांना उमेदवारी दिली. अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने मुंबईत रशीद मामूचा ठाकरे गटात पक्षप्रवेश झाला होता. ’पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देत हिंदूंची घरे पेटवणारा दंगलखोर म्हणून रशीद मामू विरोधात यापूव अनेकदा आरोप झाले आहेत.
3) हारुन खान : ठाकरे गटाचे वर्सोवातील आमदार हारुन खान यांच्या मुलीला (सबा हारून खान) उबाठाने यंदा प्रभाग क्र. 64 उमेदवारी जाहीर केलेी. हारुन खान हे तेच आमदार आहेत ज्यांच्याविरोधात ’वंदे मातरम’ला विरोध करणारा उबाठाचा कट्टरतावादी आमदार म्हणून यापूव अनेकदा आरोप झाले आहेत.