Osman Hadi : उस्मान हादीचा मारेकरी दुबईत; बांगलादेश तोंडघशी

Total Views |
 
Osman Hadi
 
मुंबई : (Osman Hadi) बांगलादेशमधील चर्चेत असलेल्या उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेशाने भारतावर आरोप केला होता. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या फैसल करीम मसूद याने एक व्हिडीओ प्रसारित करत आपण भारतामध्ये नसून दुबईमध्ये असल्याचे स्पष्ट केले. (Osman Hadi)
 
त्याने या हत्येशी कोणत्याही प्रकारचा संबंध असल्याचे फेटाळून लावत स्वतःला निर्दोष असल्याचे सांगितले, त्याने त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर खोटे आरोप केले जात असल्याचा दावा केला. त्याने उस्मान हादी याचा संबंध जमात या संघटनेशी होता आणि कदाचित त्याच संघटनेशी संबंधित काही लोकांनी हा हल्ला केला असावा, असे म्हटले आहे. (Osman Hadi)
 
हेही वाचा :  Switzerland Bar Blast : स्वित्झर्लंडमध्ये स्की रिसॉर्टमधील बारमध्ये भीषण स्फोट! अनेक जण ठार झाल्याची माहिती
 
ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांनी यापूर्वी दावा केला होता की, फैसल करीम मसूद भारतात पळून गेला असून, हलुआघाट सीमेद्वारे त्याने भारतात प्रवेश केला आहे. मात्र, नंतर मेघालयमध्ये तैनात असलेल्या बीएसएफच्या आयजी यांनी हा दावा फेटाळून लावत सीमापार केल्याचा कोणताही पुरावा आढळलेला नसल्याचे सांगितले होते. (Osman Hadi)
 
उस्मान हादीची (Osman Hadi) हत्या करण्याचा आरोप करण्यात आलेला फैसल करीम मसूद हा एका आयटी कंपनीचा मालक असून त्याने उस्मानला राजकीय देणगी दिल्याची कबुली दिली आहे. मात्र ही देणगी पूर्णपणे कायदेशीर आणि व्यावसायिक कारणांसाठी होती, कोणत्याही गुन्हेगारी कटाचा त्यात सहभाग नव्हता, असे त्याने स्पष्ट केले आहे. (Osman Hadi)
 
 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.