मुंबई : (Nitesh Rane) मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार, असे म्हणत मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे.
मुंबई महापालिका निवडणूकींच्या पार्श्वभूमिवर सध्या राज्यातील वातावरण तापले असून मुंबईचा महापौर कोण होणार यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरु आहे. यावर बोलताना मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की, "कित्येक दिवसांपासून मुंबईचा महापौर हा खान, पठाण किंवा अब्दुल होणार किंवा मुंबईचा महापौर कुणीतरी बुरखाधारी महिलासुद्धा बनू शकते, अशा धमक्या वारिस पठाण देत आहेत. तेव्हा ठाकरे गटाच्या कुणालाही मिरची लागली नाही. कुणीही आक्षेप घेतला नाही. पण कृपाशंकर सिंह यांनी मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, असे म्हटल्यावर सगळेच बिळातून बाहेर येऊन ओरडू लागले. या लोकांनी हिंदुंमध्ये फुट पाडण्याची सुपारी घेतलेली दिसते. पण कुणी कितीही बोंबललेत तरी मुंबईचा महापौर हा मराठी आणि हिंदूच होणार," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Nitesh Rane)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....