Maharaja Yashwantrao Holkar: श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर प्रथम यांचा राज्याभिषेक दिन सोहळा ६ जानेवारी रोजी वाफगाव किल्ल्यावर संपन्न होणार
01-Jan-2026
Total Views |
मुंबई : (Maharaja Yashwantrao Holkar) श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त भव्य ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता किल्ले वाफगाव, राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे येथे करण्यात आले आहे. होळकर राजपरिवार तसेच समस्त भारतवासी श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक महोत्सव समिती यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. (Maharaja Yashwantrao Holkar)
कार्यक्रमाची सुरुवात मंगल वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने होणार असून त्यानंतर राजराजेश्वर मंदिरात अभिषेक करण्यात येणार आहे. वाफगाव येथील ग्रामस्थांच्या हस्ते गडपूजनाचा कार्यक्रम पार पडणार असून त्यानंतर माय सह्याद्री परिवाराच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. कार्यक्रमात मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. (Maharaja Yashwantrao Holkar)
यानंतर राजसदरेकडे प्रस्थान करून होळकर राजपरिवार व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राज्याभिषेक विधी पार पडणार आहे. ऐतिहासिक घराण्यांचे वंश प्रतिनिधी तसेच राज्याभिषेक समिती सदस्यांच्या हस्ते तळी भंडार अर्पण करण्यात येणार आहे. या प्रसंगी महाराजा यशवंतराव होळकर (Maharaja Yashwantrao Holkar) यांच्या जीवनकार्यावर आधारित व्याख्यान तसेच ओवी सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. (Maharaja Yashwantrao Holkar)
कार्यक्रमात भुषणसिंह राजे होळकर उपस्थितांना मार्गदर्शन करणार असून कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. या राज्याभिषेक दिन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९८६०३६८१२८ आणि ९८२२०३९५५२ या संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे. (Maharaja Yashwantrao Holkar)