FASTag बाबत मोठा निर्णय; १ फेब्रुवारी २०२६ पासून KYC प्रक्रिया बंद

महामार्ग वापरकर्त्यांना दिलासा

    01-Jan-2026   
Total Views |

FASTag

मुंबई : (FASTag)
  सार्वजनिक सुविधा वाढवण्यासाठी आणि महामार्ग वापरकर्त्यांना होणारा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मोठा आणि दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार १ फेब्रुवारी २०२६ पासून कार, जीप आणि व्हॅन या श्रेणीतील वाहनांसाठी नवीन फास्टॅग जारी करताना केवायसी  (Know Your Vehicle) प्रक्रिया बंद करण्यात येणार आहे.

आतापर्यंत वैध वाहन कागदपत्रे असूनही, केवायसी नंतरच्या अतिरिक्त अटींमुळे फास्टॅग सक्रिय होण्यास विलंब होत होता आणि वाहनचालकांना गैरसोय सहन करावी लागत होती. नव्या सुधारणेमुळे अशा अडचणी दूर होऊन महामार्ग प्रवास अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे.

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\