मुंबई (प्रतिनिधी) : (Kiran Shelar) मुंबई तरुण भारतचे संपादक तथा पीपल्स फॉर वरळी फाऊंडेशनचे संस्थापक किरण शेलार यांची भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण मुंबई जिल्हा ‘महायुती समन्वय प्रमुख’पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणूकीसाठी भाजप-शिवसेना व आरपीआय (आठवले गट) यांची महायुती विरुद्ध उबाठा-मनसे व पवार गट अशी थेट लढत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची मैत्रीपूर्ण लढत असणार आहे.
भाजपतर्फे दक्षिण मुंबई जिल्हाधक्षा शलाकाताई साळवी यांनी शेलार यांना नियुक्तीपत्र दिले आहे. पत्रात केलेल्या उल्लेखानुसार, ‘दक्षिण मुंबई जिल्हा महायुती समन्वय प्रमुख’ या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. निवडणूक काळात भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांमध्ये समन्वय राहावा, अशी भाजपची अपेक्षा आहे.