नवी दिल्ली : (India-Pakistan) २००८ च्या द्विपक्षीय कॉन्सुलर अॅक्सेस कराराच्या तरतुदींनुसार भारत आणि पाकिस्तान यांनी गुरुवार दि. १ जानेवारी रोजी नवी दिल्ली आणि इस्लामाबाद येथे एकाच वेळी राजनैतिक माध्यमांद्वारे एकमेकांच्या ताब्यात असलेल्या कैदी आणि मच्छिमारांच्या याद्यांची देवाणघेवाण केली. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. (India-Pakistan)
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानुसार, भारताने त्यांच्या ताब्यात असलेल्या ३९१ पाकिस्तानी कैदी आणि ३३ मच्छिमारांची यादी पाकिस्तानला दिली. त्याचप्रमाणे, पाकिस्तानने त्यांच्या ताब्यात असलेल्या ५८ भारतीय कैदी आणि १९९ मच्छिमारांची यादी भारताला दिली आहे. भारत सरकारने पाकिस्तानला त्यांच्या ताब्यातील कैदी, मच्छिमार, बोटी तसेच बेपत्ता भारतीय संरक्षण कर्मचाऱ्यांची लवकर सुटका करून मायदेशी परत पाठवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, शिक्षा पूर्ण केलेल्या १६७ भारतीय मच्छिमार आणि कैद्यांची सुटका आणि त्यांची सुरक्षित परतफेड जलदगतीने करण्याची मागणीही भारताने केली आहे. (India-Pakistan)
अधिकृत आकडेवारीनुसार, २०१४ पासून सुरू असलेल्या राजनैतिक प्रयत्नांमुळे पाकिस्तानातून २,६६१ भारतीय मच्छीमार आणि ७१ भारतीय नागरी कैद्यांना मायदेशी परत आणण्यात यश आले आहे. यामध्ये २०२३ पासून परत आणण्यात आलेले ५०० मच्छीमार आणि १३ नागरी कैद्यांचा समावेश आहे. (India-Pakistan)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\