
नुकताच गणेशोत्सव धुमधडाक्यात संपन्न झाला. यादरम्यान मोदकांसोबतच पंचखाद्य खिरापतीचा प्रसादही आपल्यापैकी अनेकांनी गोड मानून ग्रहण केला असेल. पण, ही खिरापत म्हणजे केवळ तोंड गोड करणारा पदार्थ नसून, तो तितकाच पौष्टिकही आहे, याची अनेकांना बरेचदा माहिती नसते. तेव्हा, आज याच पंचखाद्य खिरापतीच्या पौष्टिक गुणांविषयी माहिती करुन घेऊया...यावर्षी सानिकाला खूप आनंद झाला. तिच्या आईने गणपतीसाठी नैवेद्य म्हणून पंचखाद्य खिरापत बनवली होती.
खरं तर तिला आईचा खूप रागच आला होता आधी. "हे असलं काहीतरी गावठी काय बनवतेस प्रसादाला” म्हणूनपण तिच्या आईने काही तिचं ऐकलं नव्हतं. तिची आई म्हणाली की, "मी बनवणार आहे. तुझ्या मित्रमंडळींना नक्की आवडेल. तू एकदा खाऊन तर बघ.” पण, तेव्हा रागाने सानिकाने त्याच्याकडे बघितलंसुद्धा नव्हतं आणि गणपतीच्या दिवशी तिच्या आईने छानपैकी चांदीच्या भांड्यात चांदीच्या चमच्यातून सगळ्यांना जेव्हा ही खिरापत वाटली, तेव्हा तोंडात टाकताक्षणी सगळ्यांच्या तोंडातून वाहवा निघाली! मग सानिकालापण वाटले, जरा खाऊन तरी बघावं आणि ती खिरापत तोंडात टाकताक्षणी इतकी विरघळून गेली, कारण खरंच अप्रतिम चव होती त्याची!
मग काय? भराभर त्याचे फोटो काढले आणि इन्स्टाग्राम, स्टेटस सगळीकडे पंचखाद्य खिरापत! ‘यम्मी’ असं टाईप करून टाकलं आणि त्यालापण एवढे लाईस मिळाले! काय असतं हे पंचखाद्य? पंचखाद्य म्हणजे याच्यामध्ये ‘ख’ पासून सुरू होणारे पाच पदार्थ असतात, खोबरं, खारीक, खसखस, खडीसाखर, खिसमिस किंवा मनुका. हे सर्व पाच पदार्थ एकत्र करून त्यापासून पंचखाद्य तयार होते आणि गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी याचा अग्रमान असतो. त्या सर्व पदार्थांचा एकत्रित वापर बुद्धिवर्धक असासुद्धा होतो. त्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धिवर्धनासाठी याचा जरूर वापर करा.
यातील एकेक पदार्थाचे काय गुणधर्म आहेत, ते आपण बघू. खोबरे-ओला नारळ आपल्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो. कुठल्याही मंगल कार्यासाठी नारळ ही शकुनाची सुरुवात असते. हा नारळ सुका झाला, वाढवला की त्यापासून सुके खोबरे तयार होते. त्याच्या वाट्या असतात किंवा नारळ किसून त्याचा किससुद्धा बाजारात उपलब्ध असतो. हा किससुद्धा बारिक-जाडा अशा विविध आकारांमध्ये उपलब्ध असतो. किसलेला किस टिकण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवला, तर तो अधिक दिवस आपण वापरू शकतो. नारळ हे ‘कोकोस न्यूसीफेरा’ या नावाने प्रसिद्ध आहे.
यामध्ये हेल्दी फॅट असते अॅण्टिऑसिडंट भरपूर प्रमाणात असतात. त्यात अॅण्टिबॅटेरियल अॅण्टिफंगल गुणधर्म असतात. नारळात भरपूर जीवनसत्वे मँगनीज, सेलेनियम, लोह, कार्बोहायड्रेट्स व प्रथिने असतात.
नारळ फोडून त्याची करवंटी काढतात. आतील गोट्याच्या दोन सारख्या वाट्या बनवतात. उन्हात सुकवतात. हेच सुके खोबरे आपण मसाल्यात वापरतो. सुकण्याच्या प्रक्रियेत पाण्याचा मूळ अवश्य कमी होतो. या तेलाचे प्रमाण ५० ते ७० टक्के असते.
दुपारी जेवण झाले की आपल्याकडे विडा खायची पद्धत होती. त्यामध्ये सुके खोबरे घालतात. त्याच्यामुळे आपल्या शरीराला योग्य त्या प्रमाणात फायबर मिळतात. पचनशक्ती सुधारते. सांधेदुखी दूर होते.
रात्री झोपायच्या आधी जर सुया नारळाचा तुकडा खाल्ला, तर झोप शांत लागायला मदत होते. याच्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर्स असल्यामुळे मलबद्धतेत फायदा होतो.
सुया खोबर्यात लोह अधिक मात्रेत असते. त्यामुळे रोज रात्री खोबरे खाल्ल्यास अॅनिमियापासून लवकर सुटका होते. याच्या वापराने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. संसर्गजन्य आजार दूर राहतात.
सुके खोबरे त्वचेसाठी खूप उपयोगी आहे. त्वचा निरोगी चमकदार बनवते. यामुळे आपण आपल्या शरीराला खोबरेल तेलाने अभ्यंग जरूर करावे. तसेच खोबरेल तेलाचा उपयोग केसांना डोयाला लावण्यासाठी केला, तर केस घनदाट काळेभोर राहतात. दक्षिणेकडील राज्यांमध्ये जेवणामध्ये खोबरेल तेलाचा वापर करतात.
वजन कमी करायला मदत होते. हृदयाचे आरोग्य सुधारते. त्याच्यामुळे शुगरसुद्धा नियंत्रणात राहण्यास मदत होते. सुके खोबरे शरीरातील आम्लांचे स्राव नियंत्रित करते. त्यामुळे आम्ल-पित्त उपयोगी असते. सुके खोबरे अनेक पदार्थांमध्ये वापरले जाते, जसे की चटणी, भाजी, भाज्यांची ग्रेव्ही यांपासून लाडू, वड्या, मिठाया असे गोड पदार्थसुद्धा बनवले जातात. त्याची सुकी पावडर बनवून त्यापासून सूपमध्येसुद्धा त्याचा वापर करतात.
खसखस : दिसायला सर्वांत छोटा, पण गुणधर्माने मोठा असा पदार्थ मादक द्रव्य म्हणून प्रसिद्ध असणारी अफू त्याच्या फळात बोंडात निर्माण होणारे बी म्हणजे खसखस. त्यामुळेच आखाती देशांमध्ये खसखस किंवा खसखशीपासून बनवलेले पदार्थ नेणे अपराधजन्य आहे. पांढरे करडे पिवळट अशा रंगाचे हे बारिक दाणे असतात. भारतीय खसखस प्रामुख्याने पांढर्या रंगाचे असते. प्रामुख्याने हिमालयाच्या पायथ्याशी त्याचे पीक घेतले जाते. थंड हवेत याची चांगली वाढ होते.
मध्य युरोप, दक्षिण आशियामध्ये याचा अधिक प्रमाणात उपयोग करतात. आयुर्वेदानुसार खसखस पचायला जड मधुर चवीची शक्तिवर्धक वातनाशक आहे. बाळंतपणामध्ये शरीरात वात वाढतो. तसेच शक्तिवर्धक उत्तम स्तन्यवर्धक म्हणून पण खसखस खीर करून प्रसूता स्त्रीला देण्याची पद्धत आहे.
यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस अधिक प्रमाणातून मिळते, या पुष्कळ प्रमाणात कर्बोदके काही प्रमाणात प्रथिने स्निग्ध पदार्थ व तंतुमय पदार्थ असतात. खसखशीचे फायदे यात फायबरची मात्र अधिक असते. त्यामुळे कॉन्स्टिपेशन, पोट फुलणे, गॅसेस होणे, पाचनसंबंधी अनेक समस्या दूर करण्यात उपयोगी ठरते. यामध्ये शांत करण्याचा गुण असतो. तणाव कमी करतो व झोपेच्या दर्जामध्ये सुधार करतो.
हाडांचे स्वास्थ्य यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस अधिक मात्र असते. त्यामुळे ते हाडांना मजबूत बनवायला मदत करते. वाईट कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत होते. त्याच्यामुळे हृदयाचे स्वास्थ्य चांगले राहते. त्वचा, केसांसाठी, डोळ्यांसाठी खूपच उपयोगी आहे. डोळ्यांच्या आजारांमध्ये संक्रमण रोखण्यामध्ये फायदा करते. खसखस प्रजनन क्षमता वाढवते. यामध्ये अॅण्टिऑसिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे मेंदूच्या कार्यात मदत होते. मेंदूचा रक्तपुरवठा चांगल्या प्रकारे वाढतो. खसखशीमध्ये पोटॅशियम असते. वेदनानिवारक गुण त्यामुळे तो किडनी स्टोनमध्ये उपयोग पडतो. खसखशीतून प्राप्त होणारे तेल आपल्या त्वचेला मुलायम बनवते. त्यामध्ये पाण्याचे प्रमाण वाढवते. चेहर्यावरचे काळे डाग कमी करायला मदत होते. त्यावर खसखशीचे तेल लावावे. खसखस स्क्रब आपली त्वचा साफ करते आणि डागरहित बनवायला मदत होते. याचा उपयोग केसांसाठीपण चांगला होतो, जर खसखस नारळाच्या दुधामध्ये मिसळून केसांना लावली, तर केसांची वाढ चांगली होते. अकाली होणारे पांढरे केस थांबू शकतात. यामध्ये झिंक आणि फॉलिक अॅसिड असते. त्यामुळे गर्भावस्थेच्या पहिल्या आठवड्यामध्ये खूप उपयोगी पडते. परंतु, आपल्या डॉटरच्या सल्ल्यानेच घ्यावे. अति खसखशीचे दुष्परिणाम अधिक मात्र सेवन केल्यास पोट फुगते, वात होतात.
बाळंतिणीसाठी खसखशीची खीर - चार चमचे खसखस रात्री पाण्यात भिजत घालावी. सकाळी ती बारिक वाटावे. नंतर त्यात बदाम काजू खडीसाखर घालून मिसरवर फिरवावे. पातेल्यात दोन चमचे तूप गरम करून त्यात ही पेस्ट घालून परतावे. नंतर दूध घालून उकळवावे. चवीसाठी वेलचीपूड घाला.
खारीक : खजूर वाळवून खारीक बनवतात. हा सुक्या मेव्याचा प्रकार आहे. हे चवीला गोड असते. चॉकलेटी रंगाचे ओले. खजूर वाळल्यानंतर त्याची खारीक बनते. याला ’ऊरींश र्श्रिीा’ म्हणतात. प्रत्येक दोन खजुरामागे तीन ग्रॅम फायबर असतात. एक ग्रॅम कॅलरीज असतात. गोड खाण्याची इच्छा झाली व मधुमेह असेल, तर तुम्ही खाली खाऊ शकता. महिलांच्या मासिक पाळी व सुलभ प्रसूतीसाठी चांगली असते. पुरुषांच्या आरोग्यासाठी खजूर फायद्याचा असतो. बिर्याणी निर्मितीसाठी खारीक खाण्याचा सल्ला दिला जातो. खारीक ऊर्जेचे भांडार असते. हाडांच्या बळकटीसाठीही ते उपयोगी असते. यात फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम पोटॅशियम असते. आर्थरायटिसमध्ये उपयोगी असते. शरीरात रक्ताची कमतरता झाली, तर अॅनिमियाची शयता असते. नैसर्गिक पद्धतीने रक्तवाढीला मदत होते. त्वचेसाठी लाभदायक खजुरात मोठ्या प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व असते. ते त्वचेची इलॅस्टिसिटी चांगली ठेवण्यास मदत करते. खारीक खाण्याने मुरुमचा त्रास होत नाही. त्वचेला नैसर्गिक मोईश्चरायझर मिळते. ओलावा येतो. यात मोठ्या प्रमाणात अॅण्टिऑसिडंट घटक असतात, जे त्वचेला इतर समस्यांपासून दूर ठेवायला मदत करतात. यातील घटक त्वचेचे तारुण्य राखण्यास मदत करते. केसांच्या समस्या दूर करते. यातील कॅल्शियम, व्हिटामिन केसांच्या वाढीला चालना देते. कोंडा व केसगळती कमी करते, हेल्दी स्काल्प ठेवण्यास मदत करते. त्यामुळे केस अधिक सुंदर आणि आरोग्यदायी दिसू लागतात. त्यामुळे खारीक आपल्या नित्य आहारात असायला हवे. ते वीर्यवर्धकही आहे. दुधामध्ये खारीक पावडर घालून दूध घ्यावे. गर्भवती स्त्रीलासुद्धा दुग्धवाढीसाठी खारकेची खीर करून द्यावी. यामध्ये फायबरचा साठा अधिक असतो. त्यामुळे पोटाचे आरोग्य सुधारते. यावेळी आपल्याला खूप गोड खाण्याची इच्छा होते. त्यावेळेला चघळून चघळून खारीक खाल्ली, तर साखर खावीशी वाटत नाही. खारकेपासून आपण बरेच पदार्थ बनवू शकतो. त्यापासून आपण लाडू करतो, खारे खलवा बनवतो, खारीक मिल्कशेकसुद्धा करू शकतो. खारकेची बर्फी करता येते. डिंकाच्या लाडवांमध्ये आपण खारीक पावडर घालतो.
खडीसाखर भारतात उसाची लागवड प्राचीन काळापासून होत आहे. त्याच्या रसापासून साखर व खडीसाखर बनवली जाते. खडीसाखर बनवण्याची रीत भारतानेच चीनला शिकवली. हिंदीमध्ये याला ‘मिश्री’ म्हणतात किंवा ‘धागेवाली मिश्री’सुद्धा म्हणतात. भावप्रकाशनुसार सर्व साखरेमध्ये हिला उत्तम मानली जाते. एखादी व्यक्ती बेशुद्ध होऊन पडली असेल, तिच्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाले असेल, तर रक्तशर्करा रित वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो. सर्दी किंवा सतत उलट्या होत असतील, तर तोंडामध्ये खडीसाखरेचा खडा धरून ठेवावा. काही कारणांमुळे मळमळ होत असेल, तरीसुद्धा खडीसाखरेने ती कमी होते.
उचकी - उचकी थांबत नसेल, तेव्हा सुद्धा तोंडात खडीसाखरेचा खडा धरून ठेवावा. शरीराचे तापमान कमी करण्यासाठी खडीसाखर उपयोगी पडते. याच्यात कर्बोदके भरपूर असल्यामुळे शरीराला पोषण देते व तापामध्ये ऊर्जा कायम ठेवते. शुक्रकारिणी प्राकृतिक रूपात कामोदीपक आहे. हे चक्षुष्य आहे. डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयोगी आहे. कुष्ठ त्वचा विकारात उपयोगी आहे. व्रण, अल्सर असतील, तर उपयोगी आहे. कफ श्वास घेण्यास कठीणही असेल, तर त्यात उपयोगी आहे. वात आणि पित्त दोषांना संतुलित करते. ज्यांना मधुमेह आहे, अशांना मात्र ही साखर न खाणे गरजेचे आहे. लहान मुलांना साखरेऐवजी खडीसाखर बारीक करून त्याचा वापर करावा, त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते.
खिसमिस किंवा बेदाणे : द्राक्षे वाळवून बेदाणे तयार करतात. त्यामुळे या द्राक्षाचे सर्व गुणधर्म आलेले असतात.
हिरवी द्राक्षे वाळवली असता, आपल्याला बेदाणे मिळतात आणि काळी द्राक्ष वाळवली की काळ्या मनुका मिळतात. सुया मनुका नुसत्या खाऊ शकतो किंवा पाण्यात भिजवूनसुद्धा पाण्यात भिजवून खाल्ल्याने याचे फायदे अधिक जास्त मिळतात. एक कपभर पाणी उकळवावे. त्यात दहा ते पंधरा बेदाणे रात्री भिजत घालावेत. सकाळी उठल्यावर गाळून ते पाणी प्यावे. दहा मिनिटांनी त्या मनुकासुद्धा चावून चावून खाव्यात. त्याने शरीराला खूप फायदा मिळतो. यामध्ये जीवनसत्व ‘ब’, ‘क’ साखर, लोह, पोटॅशियम, अॅण्टिऑसिडंट असतात. खनिजांबरोबरच यात अधिक प्रमाणात फायबर्ससुद्धा असतात. त्यामुळे आपल्या शरीराला व मनाला ऊर्जा प्राप्त होते व दिवसभर आपण ताजेतवाने राहतो, असे बेदाणे खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. आपली पचनव्यवस्था चांगले काम करते. हाडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते. हे पाणी प्यायल्यामुळे यकृताचे कार्य सुधारते. शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. वजन कमी करण्यासाठी मदत होते. ज्यांना अॅसिडिटीचा त्रास आहे, अशांना फायदेशीर ठरते.
रक्त शुद्ध करणे, शरीरातील वाईट कोलेस्ट्रेरॉल दूर करणे यासाठीही बेदाणे फायदेशीर ठरतात. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. बेदाण्यांमध्ये अॅण्टिऑसिडंट असतात. शरीरामध्ये कर्करोगासाठी कारणीभूत ठरणार्या फ्री-रेडीकल्सचा ते नाश करतात. बेदाण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे लहान-सहान आजार सहसा होत नाहीत. बेदाण्यांचा उपयोग आपण लाडवामध्ये करतो. चिवड्यामध्येसुद्धा ते चांगले लागतात. खिरीमध्येसुद्धा वापरतात. पुलावामध्ये बिर्याणीमध्ये त्या पदार्थाची लज्जत वाढवतात.
डॉ. अरुणा टिळक
(लेखिका इअचड ,चअ (योगशास्त्र) आहेत.)
(आरोग्य भारती, कोकण प्रांताद्वारे प्रकाशित)