भांडुपचे जितेंद्र जैन यांचे निधन

08 Sep 2025 20:33:50

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक जितेंद्र जैन तथा पप्पू जैन यांचे सोमवारी पहाटे ५ च्या सुमारास निधन झाले. ते भांडुपच्या केशव सायं शाखेचे स्वयंसेवक होते. प्रल्हाद भवन येथील ग्रंथालय सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्याजवळ होती. संघातही नेहमीच ते ग्रंथ विभागात सक्रीय राहिले. भांडूपच्या चाळीतून संघकामाला सुरुवात केल्यानंतर जितेंद्र जैन संघकार्याची समज असलेला एक चांगला कार्यकर्ता म्हणून ओळखले जाऊ लागले.

इयत्ता सातवीत असताना त्यांनी एक हस्तलिखित अंक खुप मेहेनत घेउन प्रकाशित केला होता. विशेष म्हणजे त्यांचे संपादक, लेखक आणि प्रकाशक ते स्वतःच होते. त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे गेल्यावर ग्रंथ संवादचे काम समर्थपणे सांभाळले. कुठलेही नवीन पुस्तक आले की ते वाचुन त्यावर अतिशय मार्मिक असा अभिप्राय ते देत असत. वळणदार अक्षर, निर्दोष टंकलेखन, पुस्तकांची अतिशय आवड, मृदू स्वरात बोलणे ही त्यांची खास वैशिष्ट्ये होती.


Powered By Sangraha 9.0