पंजाबमधील पूर परिस्थिती पाहता स्वयंसेवकांच्या सेवाकार्यांला वेग

08 Sep 2025 13:51:48
मुंबई : पंजाबमध्ये आलेल्या महापुराच्या भीषणतेकडे पाहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समाजाच्या सहकार्याने आपल्या सेवा कार्यांची गती अधिक वाढवली आहे. पंजाब प्रांत संघचालक इकबाल सिंग यांनी सांगितले की संघ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचत असून उपेक्षित भागांमध्ये सेवा कार्यांना प्राधान्य दिले जात आहे.

इकबाल सिंग यांनी सांगितले की सेवा भारती, भारत विकास परिषद, विद्या भारती, किसान संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, माधवराव मूळे सेवा समिती, सरहदी लोकसेवा समिती आदी संस्थांच्या माध्यमातून संघाचे स्वयंसेवक आपत्तीग्रस्त लोकांपर्यंत पोहोचत आहेत. पंजाबमधील पूरग्रस्त भागांत ४१ ठिकाणी संघाचे १७४३ स्वयंसेवक सेवा, मदत व बचाव कार्यात गुंतलेले आहेत.

लोकांना गरजेनुसार शिजवलेले अन्न, राशन किट, पिण्याचे पाणी, ताडपत्री, चादरी, फोल्डिंग खाट, निवारा, औषधे आणि जनावरांसाठी हिरवे व सुके चारे उपलब्ध करून दिले जात आहेत. अनेक ठिकाणी वैद्यकीय शिबिरेही आयोजित केली जात आहेत. संघाच्या स्वयंसेवकांनी आतापर्यंत १२,००० कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवली आहे.
Powered By Sangraha 9.0