अनंत चतुर्दशीच्या दिवशी आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय, ठाणे यांच्या "राष्ट्रीय सेवा योजनेच्या‌ स्वयंसेवकांचा पोलिस दलाच्या समवेत वाहतूक नियंत्रण उपक्रमात सहभाग."

    07-Sep-2025
Total Views |

ठाणे : शनिवार, दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनाच्या निमित्ताने‌ शारदा एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी वागळे इस्टेट पोलीस स्टेशनमधील पोलिसांच्या समवेत वाहतूक नियंत्रण उपक्रमात सहभागी होऊन त्यांना सहकार्य केले.

हा उपक्रम राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सागर जाधव, प्रा.‌ संजना भाबळ व सहकार्यक्रम अधिकारी प्रा. आशा जाधव यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाने रायलादेवी तलाव, एमआयडीसी, वागळे इस्टेट, ठाणे (प.) येथे पार पडला. या उपक्रमात संस्थेच्या सदस्या व ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षाला लिखिते मॅडम, प्रा. आदित्य पेंडसे, महेंद्र मालपोटे यांनी उपस्थित राहून सर्व स्वयंसेवकांचा उत्साह वाढविला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पोलिसांच्या सोबत काम करण्याचा एक वेगळाच अनुभव या उपक्रमामध्ये अनुभवला तसेच पोलीस दलाला केलेल्या या सहकार्याबद्दल वागळे इस्टेट पोलीस स्टेशनच्या‌ पोलिसांनी सर्व स्वयंसेवकांचे कौतुक केले व त्यांना पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.