मुंबई : 'हलाल लाइफस्टाइल'वर आधारित टाऊनशिप उभारण्याचे प्रकार मुंबई परिसरात आणि कर्जत ताकुक्यात होत असल्याचे नुकतेच निदर्शनास आले. यासंबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण प्रकरण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगापर्यंत पोहोचले. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशा हलाल टाऊनशिपच्या निर्मितीवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. कोणत्याही परिस्थितीत अशा टाऊनशिपला सरकार मान्यता देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, हलाल टाऊनशिपचा प्रकार महाराष्ट्रात चालणार नाही. 'हलाल' हा प्रकार आम्ही मुळासकट काढून टाकू. अशा प्रकारच्या कोणत्याही टाऊनशिपला परवानगी दिली जाणार नाही आणि याप्रकरणी संबंधितांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल. जर यासंदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रयत्न होत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. सरकारच्या धोरणांमध्ये अशा संकल्पनांना कोणताही थारा नाही.