योजना काँग्रेसची, यशस्वी अंंमलबजावणी मात्र मोदींकडून! ; केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची काँग्रेसची निरर्थक टीका

05 Sep 2025 20:57:50

मुंबई, केंद्रातील मोदी सरकारने गेल्या ११ वर्षांत मनरेगा योजनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून, या योजनेला सरकारकडून कमी निधी दिला जात असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.मनरेगा योजनेला २० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सरकारवर आरोप केले.

मोदी सरकारने मनरेगा योजनेचे उद्दिष्ट नाहीसे व्हावे, यासाठी या योजनेला निधी पुरवठा कमी केला असून, या विरोधात आवज उठवला पाहिजे, अशी टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली. केंद्र सरकारने गेल्या पाच महिन्यांमध्येच ङ्गमनरेगाफ योजनेसाठी तरतूद केलेल्या निधीतून ६० टक्के रक्कम खर्च केली असल्याने, निधी संपल्यावर देशातील ग्रामीण जनतेच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे जयराम रमेश यांनी म्हटले आहे. गेल्या अकरा वर्षांपासून मनरेगाला सतत कमी निधी मिळत असून, महागाई वाढत आहे. असे असूनही गेल्या तीन वर्षांपासून योजनेचे बजेट स्थिर आहे. याचाही परिणाम योजनेच्या यशावर होत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसने जरी ही टीका केली असली, तरीही मोदी सरकारची मनरेगामधील कामगिरी ही संपुआपेक्षा उजवी आहे. मोदी सरकारने काँग्रेस सरकारच्या काळात सुरु झालेली ही ग्रामविकासाची योजना सुरुच ठेवली आहे. आर्थिक वर्ष २००६-०७ ते आर्थिक वर्ष २०१३-१४ या संपुआ २च्या काळात एकूण १ हजार ६६० कोटी मनुष्यदिवस रोजगार निर्मिती झाली. तर रालोआ-२ च्या काळात आर्थिक वर्ष २०१४-१५ ते आर्थिक वर्ष २०२४-२५ दरम्यान एकूण २९२३ कोटी मनुष्यदिवस रोजगार निर्मिती झाली आहे. तसेच, या योजनेतील लाभार्थ्यांचे पैसे थेट लाभ हस्तांतरण योजनेच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मनरेगाच्या अंतर्गत ९९.७९ टक्के घरांना रोजगार देण्यात आला आहे.

दरम्यान, ग्रामीण भागात रोजगारामध्ये वाढ करण्यासाठी काँग्रेसने संपुआ-२च्या काळात २००५ मध्ये ङ्गमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याफची निर्मिती करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण पातळीवर स्थानिक कामांमधून रोजगार निर्मिती करण्याची तरतूद या योजनेमध्ये होती. या योजनेमधून ग्रामीण भागातील अकुशल कामगारांना १०० दिवसांचे काम देण्याची तरतूदही होती. यावर्षी या योजनेला २० वर्ष पूर्ण झाली आहेत.

संपुआ-२च्या काळातील मनरेगासाठीची अर्थसंकल्पीय तरतूद

वर्ष सुधारित अंदाज (कोटींमध्ये)

२००८-०९ ३०,०००

२००९-१० ३९,१००

२०१०-११ ४०,१००

२०११-१२ ३१,०००

२०१२-१३ ३०,२८७

२०१३-१४ ३३,०००


रालोआ-२च्या काळातील मनरेगासाठीची अर्थसंकल्पीय तरतूद

वर्ष सुधारित अंदाज ( कोटीमध्ये)

२०१९-२० ७१,०००.८१

२०२०-२१ १,११,५००

२०२१-२२ ९८,०००

२०२२-२३ ८९,४००

२०२३-२४ ८६,०००

२०२४-२५ ८६,०००



Powered By Sangraha 9.0