गर्दीचे स्‍मार्ट व्‍यवस्‍थापन; सुरक्षितपणे सण साजरा करण्‍यास मदत

    05-Sep-2025
Total Views |

दरवर्षी संपूर्ण भारतात गणेशोत्‍सव जल्‍लोषात व उत्‍साहात साजरा केला जातो. सार्वजनिक मंडळांमध्‍ये गणपती बाप्‍पाची प्रतिष्‍ठापना करण्‍यापासून विसर्जन मिरवणूकांपर्यंत रस्‍त्‍यांवर गणपती बाप्‍पाचा जयघोष आणि जल्लोष पाहायला मिळतो. लाखो भाविक गणपती बाप्‍पाचा आशीर्वाद घेण्‍यासाठी येतात. या साजरीकरणामधून आनंद, भक्‍ती व सांस्‍कृतिक अभिमान दिसून येतो. पण, या जल्‍लोषपूर्ण साजरीकरणासह काही समस्‍या देखील येतात, जसे चेंगराचेंगरी, सार्वजनिक अशांततेचा उद्रेक आणि गतकाळात काही कारणांनी उत्सवाला गालबोट लागलेल्या संस्‍थांवरील अतिरिक्त ताण. या वर्षी उत्‍सवाला सुरूवात झाली असली तरी सार्वजनिक ठिकाणी अशा गर्दीचे व्‍यवस्‍थापन करणे राष्‍ट्रीय समस्‍या बनली आहे.

गर्दीवर नियंत्रण ठेवण्‍यासह त्‍यांची सुरक्षितता व सन्‍मानाची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. लोक आत्‍मविश्वास व आनंदाने मिरवणूका पाहण्‍यासाठी येतात. भाविक मंडपामध्‍ये प्रवेश करतात, मिरवणूकांमध्‍ये सहभागी होतात किंवा बाप्‍पाचे विसर्जन पाहण्‍यासाठी मुलांना सोबत घेऊन येतात तेव्‍हा त्‍यांच्‍या सुरक्षिततेला प्राधान्‍य देण्‍याची गरज आहे. यामुळे गर्दीचे व्‍यवस्‍थापन अधिक प्रगत करणे गरजेचे आहे, व्‍यक्‍तींच्‍या प्रतिबंधात्‍मक संरक्षणाला प्राधान्‍य दिले पाहिजे.

सुरक्षिततेला अधिक प्राधान्‍य देणे म्‍हणजे फक्‍त दुर्घटनांना प्रतिब‍ंध करणे नाही तर निष्‍ठेसह सण साजरा करणे आहे. ज्‍येष्‍ठ नागरिक, पालकांसोबत असणारी मुले आणि विकलांग व्‍यक्‍ती या सर्वांना आनंदमय वातावरणात सुरक्षित वाटले पाहिजे. सर्वसमावेशकता यशस्‍वी गणेशोत्‍सवासाठी खरा उपाय ठरतो. प्रेरक बाब म्‍हणजे, भारतात मोठ्या गर्दीची हाताळणी करण्‍याची क्षमता असलेले तंत्रज्ञान उपलब्‍ध आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स (एआय) अधिक गर्दी ओळखण्‍यासाठी लाइव्‍ह फीड्स स्‍कॅन करू शकते आणि स्‍मार्ट रिस्‍टबँड्स व ट्रॅकर्स यांसारखे इंटरनेट ऑफ थिंग्‍ज (आयओटी) डिवाईसेस गर्दी वाढण्‍याबाबत रिअल-टाइम सिग्‍नल पाठवू शकतात. जबाबदारीने वापरल्‍यास सर्व्‍हायलन्‍स कॅमेरे आणि देखरेख ठेवणाऱ्या यंत्रणांकडे गोपनीयतेचे उल्‍लंघन म्‍हणून नाही तर सुरक्षिततेचे संरक्षक म्‍हणून पाहिले पाहिजे.

उदाहरणार्थ, एआयसह सुसज्‍ज कॅमेरे विसर्जन मार्गांवरील अडथळे वेळेपूर्वीच शोधू शकतात, त्यामुळे परिस्थिती धोकादायक होण्यापूर्वी अधिकारी कारवाई करू शकतात. बॅरिकेड्समध्ये फेरफार झाल्यास सेन्सर्सवर आधारित अलार्म सिस्टम आयोजकांना इशारा देऊ शकतात. पण, या उपाययोजनांना अधिक गोपनीयता आणि नागरी स्वातंत्र्याच्या सुरक्षा उपायांचे पाठबळ मिळाले पाहिजे. तंत्रज्ञानाने भीती नव्हे तर विश्वास वाढवला पाहिजे.

गणेशोत्‍सव मिरवणूकींदरम्यान सुरक्षिततेची जबाबदारी फक्‍त एकाच संस्‍थेला देता येऊ शकत नाही. यासाठी महापालिका अधिकारी, पोलिस आणि सार्वजनिक मंडळांमध्‍ये सहयोगाची गरज आहे. महानगरपालिकांनी विसर्जन मार्गांवर व्‍यवस्‍थेचे नियोजन करावे, उत्तम आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा स्थापन करावी आणि श्‍वास गुदमरला जाणाऱ्या ठिकाणांना प्रतिबंध करण्यासाठी पायाभूत सुविधा वाढवाव्यात. दुसरीकडे, पोलिस अधिकाऱ्यांनी करूणेसह शिस्तीचे संतुलन केले पाहिजे, संयमी संवाद, भांडण निराकरण आणि आश्वासन यांसारख्या कौशल्यांवर भर दिला पाहिजे. आयोजकांनी मंडपांमध्ये क्षमता नियंत्रण, ड्रिल इव्हॅक्युएशन आणि सुरक्षा तपासणी करून जबाबदारी स्वीकारली पाहिजे.

नागरिकांनी देखील त्‍यांचे योगदान दिले पाहिजे. जनजागृती मोहिमांमधून सहभागींना अनावश्यक धक्‍काबुक्‍की न करण्यापासून पडणाऱ्यांना मदत करण्यापर्यंत गर्दीच्या ठिकाणी सुरक्षित राहण्याचे मार्गदर्शन मिळू शकते, मुंबई, पुणे आणि हैदराबादमध्‍ये मोठ्या प्रमाणात व जल्‍लोषात गणेशोत्‍सव साजरा केला जातो, ज्‍यामुळे या शहरांमधील सार्वजनिक उत्‍सवांसाठी आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे उपाय केले पाहिजेत, ज्‍यामधून धर्म व सुरक्षितता एकत्रितपणे कशाप्रकारे यशस्‍वी ठरू शकतात हे दिसून येईल.

शहरी रचना देखील या उपायाचा महत्त्वाचा भाग आहे. मिरवणूकांसाठी पादचाऱ्यांचे मार्ग वाढवणे, गर्दी कमी करण्यासाठी अनेक विसर्जन स्‍थळं असणे आणि विकलांग व्‍यक्‍तींसाठी अनुकूल पायाभूत सुविधा यांमुळे जोखीम लक्षणीयरित्या कमी होऊ शकतात. स्मार्ट कमांड-अँड-कंट्रोल हब मिरवणूकांचा रिअल टाइममध्ये मागोवा घेऊ शकतात, ज्‍यामुळे मिरवणूकांमध्‍ये होऊ शकणाऱ्या धोक्यांना प्रतिसाद म्हणून त्वरित कारवाई करता येईल. पोलिस व स्वयंसेवकांच्‍या नियमित कवायती, सामान्य लोकांमध्ये जागरूकता यामुळे सर्व स्‍तरावर सुसज्‍जतेची खात्री मिळेल.

उत्तमरित्या गर्दीचे व्‍यवस्‍थापन करण्‍याच्‍या गरजेकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही. गतकाळात साजरीकरणादरम्‍यान घडलेल्‍या दुर्घटनांमधून कटू शिकवणी मिळाल्‍या आहेत. पण आता ही स्थिती बदलण्‍याची वेळ आली आहे. सुरक्षितपणे उत्‍सवाचे साजरीकरण म्‍हणजे निष्‍ठेसह सण साजरा करताना कोणत्‍याही पालकांना गर्दीमध्‍ये त्‍यांचे मूल हरवण्‍याची, गर्दीमध्‍ये चेंगराचेंगरी होण्‍याची आणि नुकसान होण्‍याची भिती राहणार नाही.

दूरदृष्‍टी, करूणा व सहयोगासह ही जबाबदारी पार पाडली तर गणेशोत्‍सव अधिक आनंद, एकता आणि आध्‍यात्मिक अभिमानासह साजरा करता येऊ शकतो. हाती असलेले कार्य स्‍पष्‍ट आहे, ते म्‍हणजे असा समाज घडवणे जेथे उत्‍सवादरम्‍यान सुरक्षिततेला देखील महत्त्व दिले जाईल, तंत्रज्ञान सुरक्षारक्षकाप्रमाणे काम करेल आणि प्रत्‍येक नागरिकाला त्‍यांचे जीवन व प्रतिष्‍ठेला महत्त्व दिले जात असल्‍याची खात्री मिळेल. यामुळे गणेशोत्‍सव निष्‍ठेचा सण, तसेच भारत समुदायाच्‍या संरक्षणासाठी आधुनिकतेसह परंपरा कशाप्रकारे जोपासतो यासाठी आदर्श देखील बनेल.

मोहित कंबोज
(अॅस्‍पेक्‍ट ग्‍लोबल व्‍हेंचर्सचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आणि एमकेबी फाऊंडेशनचे संस्‍थापक)