रिलायन्स जिओला 9 वर्ष पूर्ण ; ५० कोटी ग्राहकांना खास सेलिब्रेशन प्लॅनची भेट

05 Sep 2025 12:28:24

मुंबई : रिलायन्स जिओ ५ सप्टेंबर रोजी आपल्या लाँचिंगच्या दहाव्या वर्षात पदार्पण करणार आहे. नऊ वर्षांचा प्रवास पूर्ण केल्याच्या निमित्ताने रिलायन्स जिओचे चेअरमन आकाश अंबानी यांनी ५० कोटींपेक्षा जास्त जिओ ग्राहकांना अनेक नवीन सेलिब्रेशन प्लॅनची भेट दिली. यात अमर्यादित मनोरंजन देणारा वीकेंड प्लॅन, महिनाभर चालणारा विशेष ऑफर आणि वर्षभर सरप्राईज ऑफर्सचा समावेश आहे.

जिओ सिम युजर्ससाठी तीन मोठ्या ऑफर्स :

१. एनिव्हर्सरी वीकेंड ऑफर (५–७ सप्टेंबर):
▪ ५जी स्मार्टफोन युजर्सना कोणत्याही प्लॅनशिवाय मोफत अमर्यादित ५जी डेटा
▪ ४जी युजर्सना फक्त ₹३९ च्या अॅड-ऑनवर दररोज ३ जीबीसह अमर्यादित ४जी डेटा

२. एनिव्हर्सरी महिना (५ सप्टेंबर – ५ ऑक्टोबर):
▪ ₹३४९ व त्यापेक्षा जास्त किंमतीच्या २ जीबी/दिवस किंवा लॉन्ग-टर्म प्लॅनवर अमर्यादित ५जी डेटा
▪ जिओ फायनान्सकडून जिओ गोल्डवर २% अतिरिक्त डिजिटल गोल्ड
▪ ₹३००० किमतीचे सेलिब्रेशन व्हाउचर (जिओहॉटस्टार १ महिना, जिओसावन प्रो १ महिना, झोमॅटो गोल्ड ३ महिने, नेटमेड्स फर्स्ट ६ महिने, रिलायन्स डिजिटल १००% RC कॅशबॅक, एजेओ फॅशन डील्स, ईजमायट्रिप ट्रॅव्हल बेनिफिट्स)
▪ जिओहोमचा २ महिन्यांचा मोफत ट्रायल
▪ हे लाभ सर्व पोस्टपेड ग्राहकांनाही लागू. ₹३४९ पेक्षा कमी प्लॅन असणाऱ्यांना फक्त ₹१०० अॅड-ऑन घेऊनही हे फायदे मिळतील.

३. एनिव्हर्सरी ईयर ऑफर:
▪ ₹३४९ प्लॅनचे १२ मासिक वेळेवर रिचार्ज पूर्ण केल्यावर १३व्या महिन्यात मोफत सेवा

ग्राहकांचा विश्वास हेच सर्वात मोठं यश, “५० कोटींपेक्षा जास्त भारतीयांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जिओ भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलं आहे आणि डिजिटल समाज घडवण्याचं कार्य करत आहे. ही केवळ संख्या नाही, तर लाखो भारतीयांच्या सामूहिक आकांक्षांचा प्रतीक आहे,” असे रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे चेअरमन आकाश अंबानी म्हणाले.

नवीन जिओहोम युजर्ससाठी विशेष ऑफर (५ सप्टेंबर – ५ ऑक्टोबर):
• फक्त ₹१२०० मध्ये २ महिन्यांचा जिओहोम कनेक्शन
▪ १०००+ टीव्ही चॅनेल्स
▪ ३० Mbps अमर्यादित इंटरनेट
▪ १२+ OTT अॅप्स (जिओहॉटस्टारसह)
▪ WiFi-6 राऊटर आणि ४K स्मार्ट सेट टॉप बॉक्स
▪ Amazon Prime Lite २ महिन्यांचे मोफत सब्स्क्रिप्शन
▪ जिओ फायनान्सकडून २% अतिरिक्त डिजिटल गोल्ड
▪ ₹३००० किमतीचे सेलिब्रेशन व्हाउचर

अधिक माहितीसाठी भेट द्या: www.jio.com


Powered By Sangraha 9.0