प्रिया मराठेनंतर सिनेसृष्टीतील आणखी एका अभिनेत्याची अकाली एक्झिट; ५५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

05 Sep 2025 21:32:19

मुंबई : (Actor Ashish Warang Passed Away) अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर आता आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेता आशिष वारंग यांचे निधन झाले आहे. ठाण्यातील वर्तक नगर येथे शुक्रवारी, ५ सप्टेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.

आशिष वारंग यांच्या निधनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही मात्र, समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या डिसेंबर महिन्यात त्यांना कावीळ झाली होती, पण ते त्यातून पूर्णतः बरे झाले होते. मात्र, यावेळी अचानक आलेल्या आजारामुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे त्यांचे चाहते आणि सहकारी कलाकार हळहळ व्यक्त करत आहेत.

आशिष वारंग हे 'सूर्यवंशी', 'मर्दानी', 'सिम्बा', 'सर्कस' आणि 'एक व्हिलन रिटर्न्स' यासारख्या अनेक हिट हिंदी चित्रपटांमधील सहाय्यक भूमिकांसाठी ओळखले जातात. बहुतांशी चित्रपटांमध्ये त्यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. ‘दृश्यम’ चित्रपटात त्यांनी पोलिस इन्स्पेक्टरची दमदार भूमिका साकारली होती. त्यांच्या अभिनयासाठी प्रेक्षकांकडून त्यांना खूप प्रेम मिळाले होते.






Powered By Sangraha 9.0