मुंबई (विशेष प्रतिनिधी) - राज्याच्या वन विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) पदी एम. श्रीनिवासा राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे (Hoff Maharashtra). राव हे १९९२ बॅचचे भारतीय वन सेवेतील अधिकारी आहेत (Hoff Maharashtra). यापूर्वी ते प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) म्हणून कार्यरत होते (Hoff Maharashtra).
एम. श्रीनिवास राव यांनी बंगळूरू येथील कृषी विज्ञान विद्यापीठामधून वनीकरण विषयात सुर्वणपदक मिळवून पदवी संपादित केली आहे. एफआरआय डीमड् विद्यापीठातून वनीकरण विषयातून त्यांनी पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे आहे. भारतीय व्यवस्थापन संस्था, बंगळुरू येथून सार्वजनिक धोरण आणि व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. ते १९९२ च्या भारतीय वन सेवेच्या महाराष्ट्र कॅडरच्या बॅचचे अधिकारी आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी, देहरादून येथे व्यावसायिक वनीकरण व्यवस्थापनात त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी महाराष्ट्रात वन विभाग, आदिवासी विकास विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम कमी करण्यासाठीचा प्रकल्प, आपत्ती व्यवस्थापन आणि लाकूड विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था बंगळुरू येथे सेवा बजावली आहे. आदिवासी विकास, पर्यावरण आणि विकास, कृषी वनीकरण, वृक्ष प्रत्यारोपण, लाकूडकाम, चंदन लागवड, आपत्ती व्यवस्थापन, वनीकरण संशोधन, कायदेशीर आणि धोरण विकास ही त्यांच्या आवडीची क्षेत्र आहेत. त्यांनी अनेक संशोधन प्रकल्प तयार केले असून त्यासाठी अनुदान मिळवले आहे. त्यांनी १२ संशोधन पत्रांचे सह-लेखन केले आहे आणि एका पुस्तकाचे लेखन केले आहे. दोन राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रे आणि कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. त्यांनी एका पीएचडी संशोधन अभ्यासकाचे मार्गदर्शन देखील केले आहे.