‌‘आय लव्ह दंगल‌’चे घातक राजकारण!

30 Sep 2025 12:21:05

हिंदूंच्या उत्सवांच्या काळातच काही नतद्रष्ट कट्टरपंथी वादंग निर्माण करतात. ‌‘आय लव्ह मोहम्मद‌’ नावाचे फलक उभारण्यामागेही, असाच एक वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न दिसतो. गेल्या काही महिन्यांपासून भारताच्या विविध शहरांमध्ये रस्त्यावरील आंदोलने उभी करून, तेथील कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा हेतूत: प्रयत्न केला जात आहे. त्याचा कठोरपणे बंदोबस्त केला पाहिजे.

अनेक वर्षांपासून ‌‘आय लव्ह गिरगाव‌’, ‌‘आय लव्ह माहीम‌’ वगैरे लिहिलेले फलक हे मुंबईच्या विविध भागांत दिसतात. असेच फलक अन्य शहरांमध्येही दिसतात. एरवी निरूपद्रवी वाटणारे हे ‌‘आय लव्ह अमुकतमुक‌’चे लोण, राजकारणात घुसल्यावर मात्र त्याने देशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उभा केला आहे.

गेल्या दि. ६ सप्टेंबर रोजी ‌‘ईद-उल-नबी‌’ या मुस्लिमांच्या सणानिमित्त काढलेल्या बारावफात मिरवणुकीत, कानपूरमध्ये काहीजणांनी ‌‘आय लव्ह मोहम्मद‌’ या नावाचा कापडी फलक बांधला. मुस्लिमांच्या पारंपरिक सणात नवी प्रथा निर्माण केली जात असल्याची तक्रार करीत, त्यास हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला. पोलिसांनी त्यावर कारवाई करून तो फलक काढला खरा; पण दुसऱ्या दिवशी मुस्लिमांतर्फे तो पुन्हा लावला गेला. तो फलक फाडण्यात आल्याची अफवा पसरवली गेली आणि नंतर या अफवेने उत्तर प्रदेशच्या काही शहरांमध्ये दंगलीचे रुप घेतले. कानपूरनंतर दि. ९ सप्टेंबर रोजीच उन्नाव, महाराजगंज, कौशांबी, लखनौ इतकेच नव्हे, तर नागपूर (महाराष्ट्र), काशीपूर (उत्तराखंड) येथेही असेच फलक घेऊन, शेकडो मुस्लीम तरुण रस्त्यांवर उतरले. इतक्या ठिकाणी एकाच दिवशी या मुद्द्यावरून दंगली उसळल्या, याचा अर्थ त्या पूर्वनियोजितच होत्या. कारण, त्यात एकसारखे फलक सर्वत्र मिरविले जात होते. म्हणजेच ते फलक इतक्या शहरांमध्ये उपलब्ध होणे हाही पूर्वनियोजनाचाच भाग. दि. १५ सप्टेंबर रोजी ‌‘एआयएमआयएम‌’चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी त्यावर जाहीर प्रतिक्रिया देऊन, हा वाद राष्ट्रीय स्तरावर नेला. काल तर महाराष्ट्रातील अहिल्याबाईनगर येथेही, या मुद्द्यावरून दंगल आणि दगडफेक करण्यात आली.

प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे मुस्लीम लांगूलचालनाचे राजकारण दरवेळी नवनवे आविष्कार दाखवीत आहेत. यंदा कोलकात्यातील एका दुर्गा मंडपात दुर्गेच्या स्तोत्राऐवजी, ‌‘काबा इन माय हार्ट‌’ हे गाणे गायले गेले. मुख्यमंत्री ममता बॅनज यावेळी उपस्थित होत्या आणि त्या टाळ्या वाजवून त्या गाण्यात दंगही झाल्या. प. बंगालमध्ये हिंदूंची आणि त्यांच्या सणांची शक्य तितकी मुस्कटदाबी केली जात आहे. काबा आणि दुर्गापूजा यांचा दुरन्वयानेही काही संबंध नसताना, हिंदूंच्या सणांचा आणि देवतांचा अपमान करणे हेच तृणमूल काँग्रेसचे धोरण आहे. दोन वर्षांपूव ईदमुळे दुर्गेच्या मूतचे विसर्जनही लांबविण्यात आले होते. आता तर दुर्गेपुढे चक्क मुस्लीम काब्याची आरती गायली गेली आहे. ममता बॅनज यांच्या सरकारचे जे काही शेवटचे दिवस उरले आहेत, त्यात त्या त्यांची मुस्लीम मतपेढी अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्या दुर्गापूजेवर बंदी आणली नाही हे नशीब समजा, असेही सांगण्यासही ममता बॅनज कमी करणार नाहीत. मुस्लीम मतपेढीसाठी तथाकथित सेक्युलर पक्षांकडून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे, कट्टरवादी मुस्लिमांची भीड चेपली जात आहे. गुजरातमध्ये गांधीनगरमधील एका सार्वजनिक गरबा कार्यक्रमात तर, मंडपाला आग लावण्यापर्यंत मुस्लीम जमावाची हिंमत गेली आहे.

मात्र, यावेळची विशेष बाब म्हणजे हिंदू संघटनांनीही या मोहिमेला जशास तसे उत्तर दिले आहे. ‌‘आय लव्ह मोहम्मद‌’चे फलक येताच, अनेक हिंदू संघटनांनी त्याच धतवर ‌‘आय लव्ह महादेव‌’, ‌‘आय लव्ह श्रीराम‌’ वगैरे नावांचे फलक सर्वत्र झळकावले. गुजरात आणि काही अन्य राज्यांमध्ये दांडिया मंडपात मुस्लिमांना बंदी घालण्यात आली असून, प्रवेश करणाऱ्या व्यक्तीची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे. आपले रक्षण आपणच केले पाहिजे, या गोष्टीचे भान हिंदूंना येत असून ती स्वागतार्ह बाब आहे.

देशात अराजक निर्माण करण्याची विरोधकांची इच्छा, आता लपून राहिलेली नाही. बांगलादेश, नेपाळ वगैरे देशांमध्ये गेल्या काही महिन्यांत घडलेल्या उठावांमुळे तेथे सत्तापालट झाला. रीतसर निवडणुकीत मोदी यांना हरविणे अशक्य असल्याची खात्री विरोधकांना पटली असल्याने, आता भारतातही बेकायदेशीर मार्गाने सत्तांतर घडवून आणण्याचा विरोधी पक्षांचा मनसुबा आहे. त्यासाठीच देशात अराजक माजावे, तरुणांनी आंदोलनाच्या रूपाने रस्त्यांवर यावे आणि दंगल माजवून मोदी सरकारला उलथवून टाकावे, हीच विरोधी पक्षांची मनापासूनची इच्छा आहे. ते अर्थातच दिवास्वप्न आहे.

हे भारतात घडणे अर्थात शक्य नाही. म्हणूनच मुस्लीम समाजगटांकडून छोट्या-मोठ्या प्रमाणात दंगली घडवून, देशात केंद्र सरकारविरोधात असंतोष असल्याचे दाखण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. ‌‘आय लव्ह मोहम्मद‌’वरून होणारा संघर्ष हा त्याचाच एक भाग. या दंगली प्रामुख्याने भाजपशासित राज्यांमध्येच घडल्या आहेत, ही गोष्टही लक्षात घेण्यासारखी आहे. कसेही करून देशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा, त्यावर मोदी सरकारने कठोर कारवाई केल्यास व्हिक्टिम कार्ड खेळून त्यांच्या सरकारला बदनाम करायचे आणि कट्टरपंथीयांना चिथावणी देऊन उकसवायचे हाच देशविरोधी शक्तींचा डाव आहे. पण, जनतेला आता अमेरिकास्थित ‌‘डीप स्टेट‌’द्वारे भारतात घडवून येत असलेल्या अशा कटांची जाणीव झाली आहे. या दंगली जरी एखाद्या टूलकिटचा भाग असल्या, तरी राज्यस्तरीय नेतृत्व त्या थोपविण्यास समर्थ आहे, ही दिलासादायक बाब आहे. बाराबंकीमध्ये झालेल्या दंगलीनंतर मौलाना तौकीर रझा याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारनेही त्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

‌‘आय लव्ह मोहम्मद‌’ फलकांवरून होणाऱ्या या राजकारणामागे, समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा हेतू उघडपणे दिसतो. अशा प्रकारची वाक्यरचना, तीसुद्धा इंग्रजीत मुस्लीम समाजात कधीच वापरली जात नाही. त्यामुळे हे ‌‘आय लव्ह मोहम्मद‌’चे नसून ‌‘आय लव्ह दंगल‌’चे राजकारण आहे आणि ते देशासाठी घातकच आहे.

Powered By Sangraha 9.0