नागपूर, राज्यात अवकाळी पावसामुळे तब्बल ५० लाख हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी, संत्रा पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही परिस्थिती मागील ५० वर्षांतील सर्वात मोठी आपत्ती आहे. सरकार शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसणार आहे. सध्या शेतकरी अडचणीत असून दिवाळीपूर्वी सरकारचा मदत करण्याचा निर्धार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर-अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील मौजा दाढेरा, तिडंगी, तेलगाव, नांदा गोमुख या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांमध्ये भेट देऊन शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
राज्यातील अतिवृष्टीमुळे तब्बल ६० हजार हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी व संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. संत्र्याची संपूर्ण झाडे उन्मळून पडली असून शेतकरी बिकट परिस्थितीत सापडला आहे. ऑगस्टमध्ये २५ लाख हेक्टर आणि सप्टेंबरमध्ये २२ लाख हेक्टरवर पंचनामे झाले असून, आतापर्यंत जवळपास ५० लाख हेक्टरवरील शेती नुकसानग्रस्त ठरली आहे.
पंचनाम्यांवर बारकाईने लक्षपंचनामे काटेकोरपणे व्हावेत यासाठी महसूल विभागाला आदेश देण्यात आले आहेत. इ पंचनामे केले जात आहे.प्रत्येक पंचनामा ग्रामसभेत दाखवणे अनिवार्य केले असून, अधिकारी थेट शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. सरकारकडे चुकीचे आकडे आले तर शेतकऱ्यांचे नुकसान होईल, त्यामुळे अधिकारी फिल्डवरच राहतील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले
शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी मदतीचे आश्वासनबावनकुळे म्हणाले,एनडीआरएफच्या निकषानुसार केंद्र सरकारकडून मदत दिली जात आहे. पाच तारखेनंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्रिमंडळातील प्रमुख नेते मिळून शेतकऱ्यांना अधिकची मदत देण्याचा निर्णय घेतील. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचनाजिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की एकही शेतकरी पिक विम्यापासून वंचित राहू नये. नुकसान झालेल्या जमिनींचा पंचनामा करताना नियमांच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
हवामान बदल व जलनिसारण व्यवस्थेची गरजअतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे म्हणाले, पावसाचे नियोजन नाले-जोड प्रकल्प आणि वॉटर ग्रिड पद्धतीने झाले पाहिजे. व्हीएनआयटी कडून सर्व्हे करून शहरातील जलनिसारण, मलनिसारणाची नव्याने आखणी करावी लागेल.
कर्जमाफीवर समिती कामातखऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी समिती काम करत आहे. काहीजणांकडे फार्म हाऊस, ले आउट जमिनी आहेत. त्यांना वगळून खरी अडचणीत असलेली शेती करणारा शेतकरी मदतीस पात्र ठरली पाहिजेत, असेही ते म्हणाले.
राजकारणापेक्षा शेतकऱ्यांचे हित महत्त्वाचेकॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्यांच्या वेदनेतून राजकारण करणाऱ्यांनी टाळ्या वाजवण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.
हर्षवर्धन सपकाळ मुख्यमंत्र्यासह पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदीजी यांना भेटायला गेले होते का? असा उपहासात्मक टोला बावनकुळे यांनी सपकाळ यांना लगावला. मख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पंतप्रधानांशी बोलत असताना तिथे सपकाळ यांनी काही तिथे व्यक्ती ठेवला होता का? ते केवळ शेतकऱ्यांची काहीतरी थट्टा करण्याचं काम करत आहे. राजकीय बाबी सोडून शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहण गरजेचे आहे.शेतकऱ्यांवर जेव्हा अशी परिस्थिती येते, तेव्हा सर्वांनी पाठीशी रहाणे गरजेचे आहे. राजकीय आखाडे निवडणुकीच्या काळात करता येईल. राजकारणाच्या गोष्टी करून काही फायदा नाही.मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस कायमच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत. शेतकऱ्यांना या नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
बावनकुळे यांचा निर्धारपन्नास वर्षांत जितके नुकसान झाले नव्हते, तितके यावर्षी झाले आहे. चार प्रकल्प थांबले तरी चालतील, पण शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे, असा निर्धार बावनकुळे यांनी व्यक्त केला.
---