एआयमुळे नोकरीकपातीची लाट! 'या' अमेरिकन कंपनीकडून ४ हजार कर्मचाऱ्यांना नारळ

03 Sep 2025 11:11:56

सॅन फ्रान्सिस्को : (Salesforce CEO confirms 4,000 layoffs) हातातल्या मोबाईलपासून रस्त्यांवर धावणाऱ्या गाड्यांपर्यंत सगळ्याच क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाने शिरकाव केला आहे. एआयमुळे भविष्यात अनेक क्षेत्रातील नोकऱ्या कमी होतील, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. आता तर ही भीती खरी ठरताना पाहायला मिळत आहे. एआयमुळे अनेक कंपन्यांमध्ये नोकरकपात सुरू झाली आहे. या यादीत आता अमेरिकन क्लाऊड सॉफ्टवेअरमधील दिग्गज कंपनी 'सेल्सफोर्स'चे नाव आले आहे. 'सेल्सफोर्स'ने ४ हजार नोकऱ्यांमध्ये कपात केली आहे.

'सेल्सफोर्स'ने आपली कर्मचारी संख्या कमी करत ९ हजारावरून ५ हजारांवर आणली आहे. म्हणजेच सेल्सफोर्सच्या सपोर्ट विभागातील जवळपास निम्मी कमी करण्यात आली आहे. या नोकऱ्या कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिवच्या आहेत. त्यांचे काम आता 'एआय' करेल, मोठ्या प्रमाणात नोकरकपात केल्याची माहिती 'सेल्सफोर्स' कंपनीचे सीईओ मार्क बेनिओफ यांनी पॉडकास्टवरून दिली. बेनिओफ म्हणाले, "कंपनीने सपोर्ट टीममधील कर्मचाऱ्यांची संख्या ९ हजारने घटवून ५ हजार केली आहे. अशा तऱ्हेने कर्मचाऱ्याऱ्यांची संख्या संतुलित करण्यात यश आले आहे.

काही दिवसांपूर्वी याच सीईओ बेनिओफ यांनी उलट वक्तव्य केले होते. "एआयमुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण होणार नाही. एआय कामगारांची जागा घेण्याऐवजी त्यांची संख्या वाढवेल. माणसं कुठेही जात नाहीत", असे त्यांनी म्हटले होते.




Powered By Sangraha 9.0