उल्हासनगर, उल्हासनगर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत २२ ऑगस्ट रोजी एका अज्ञात चोरट्याने रिक्षातील प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळील जवळपास २१ हजार रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेली होती. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तो गुन्हा उघडकीस आणून त्या गुन्हातील आरोपीला अटक करण्याची कामगिरी केली आहे.
पोलीस सूत्राने दिले माहिती अनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावसंजय राठोड असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याने २२ ऑगस्ट रोजी रिक्षातील प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळील जवळपास २१ हजाराची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेऊन तो पसार झाला होता. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी या संदर्भात गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आणून त्या गुन्ह्यातील आरोपीची ओळख पटवून त्याल सापळा रचून संजय राठोड याला अटक केली आहे. या गुन्ह्यात वापरलेले हत्यार व त्यांनी जबरीने चोरून नेलेली २१ हजाराची रोख रक्कम पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केली आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपी विरुद्ध याआधी कोणते गुन्हे दाखल आहेत का याचीही तपासणी पोलीस करीत आहेत.
b