माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता कधीच माफ करणार नाही : पंतप्रधान मोदी

03 Sep 2025 09:57:54

पाटणा : (PM Narendra Modi hits out at RJD-Congress) बिहारमध्ये काँग्रेसने नुकत्याच संपवलेल्या 'मतदार अधिकार यात्रे'दरम्यान माझ्या आईबाबत अपशब्द वापरण्यात आले. या घटनेमुळे मी व्यथित झालो. या प्रकाराबाबत मी राजद-काँग्रेसला माफ करू शकतो, पण बिहारचे लोक माझ्या आईचा अपमान केल्याबद्दल त्यांना माफ करणार नाहीत", असे प्रतिपादन यावेळी पंतप्रधान मोदींनी केले.

बिहारमधील बचत गटांशी संबंधित महिलांसाठी एका नवीन सहकारी संस्थेचे कॉन्फरन्सिंग प्रणालीद्वारे उद्घाटन करताना पंतप्रधान दिल्लीत एका सभेला संबोधित करत होते.दरभंगा येथे अलीकडेच झालेल्या यात्रेदरम्यान एका व्यक्तीने मंचावर येऊन पंतप्रधानांबाबत अपशब्द काढल्याने त्यावर पहिल्यांदाच मोदींनी प्रतिक्रिया देत विरोधी पक्षांवर टीका केली. ते म्हणाले, "भारतमातेचा अपमान करणाऱ्यांना माझ्या आईबाबत अपशब्द वापरणे गैर वाटले नसेल. मात्र त्यांना शिक्षा झाली पाहिजे. माझ्या दिवंगत आईचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. ही शिवीगाळ केवळ माझ्या आईचाच नव्हे, तर देशातील माता-भगिनींचा अपमान करणारी आहे. बिहार तर माँ जानकीची भूमी आहे. तिने नेहमीच महिलांना आदर दिला आहे. राज्यातील जनता कधीही राजद आणि काँग्रेसला माफ करणार नाही,"

पंतप्रधान मोदी म्हणाले की, "माझ्या आईने स्वतःसाठी कधीही उत्तम साडीही खरेदी केली नाही. आईचे स्थान देवापेक्षा मोठे आहे. जे लोक माताभगिनींसाठी अपशब्द वापरतात, स्त्रियांना दुर्बल समजतात, त्यांची मानसिकता ही स्त्रियांचे शोषण करण्याची असते. जेव्हा असे स्त्री-विरोधी विचारसरणीचे लोक सत्तेवर येतात, तेव्हा सगळ्यात जास्त त्रास माताभगिनींना सहन करावा लागतो. राजदच्या 'माफिया राज'मध्ये नेमके हेच घडले होते."





Powered By Sangraha 9.0