मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सावंतवाडी शहरातील मोती तलावामधून वन विभागाने बुधवार दि. ३ सप्टेंबर रोजी पाच फुटांच्या मगरील जेरबंद केले (moti talav sawantwadi). आठवड्याभरापासून लावलेल्या पिंजऱ्यामध्ये मगर बुधवारी जेरबंद झाली (moti talav sawantwadi). तलावात सुरू असणारे कारंज्याचे काम आणि गणेशमूर्ती विसर्जनाच्या पाश्वभूर्मीवर सुरक्षेच्या दृष्टीने मगरीला पकडण्यात आले आहे. (moti talav sawantwadi)
सावंतवाडी शहरातील मोती तलावात गेल्या काही दिवसांपासून मगरीचा वावर दिसून येत होता. पर्यटनाच्या दृष्टीने तलावाला असणारे महत्त्व आणि त्याच्या आसपास असणारा मानवी वावर लक्षात घेता मगरीला पकडण्याची मागणी होत होती. तलावात कारंज्याचे काम सुरू असून त्याच्या चौथऱ्यावर मगर येऊन पहुडत असे. त्यामुळे वन विभागाने त्याठिकाणी आठवडाभरापूर्वी पिंजरा बसवला होता. या पिंजऱ्यात मगरी बुधवारी सकाळी कैद झालेली दिसले. त्यावेळी सावंतवाडी वन विभागाच्या जलद कृती दलाच्या कर्मचाऱ्यांनी जाऊन मगरीला ताब्यात घेतले.