क्वेटा : (Pakistan Bomb Blast) पाकिस्तानमध्ये मंगळवारी २ सप्टेंबरला झालेल्या तीन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये जवळपास २५ जणांचा मृत्यू झाला असल्याची वृत्त एएफपीने दिले आहे. यापैकी नैऋत्य प्रांतातील बलुचिस्तानमधील क्वेटा येथे एका राजकीय रॅलीत झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात १४ जणांचा मृत्यू झाला. ३५ हून अधिक जण गंभीर जखमी झाले.
क्वेटा येथील एका स्टेडियमच्या पार्किंगमध्ये शेकडो लोक जमले असताना, एक दहशतवादी बॉम्ब घेऊन आला आणि त्याने स्वतःला उडवून दिले. बीएनपी प्रमुख सरदार अख्तर यांना मारण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचे बोलले जात आहे. परंतु कोणत्याही गटाने दोन्ही हल्ल्यांची जबाबदारी ताबडतोब स्वीकारली नाही.
जखमींपैकी किमान सात जणांची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मंगळवारी इराणच्या सीमेजवळील बलुचिस्तानमध्ये झालेल्या आणखी एका हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला, तर खैबर पख्तूनख्वा प्रांतातील त्यांच्या तळावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात सहा सैनिक ठार झाले.