“हा फक्त देशभक्तीचा ड्रामा सुरू आहे!”, भारतीय संघाबद्दल काय म्हणाले राऊत?
29-Sep-2025
Total Views |
भारतीय संघाच्या
भूमिकेमुळे राऊतांचा संताप! जूना
व्हिडिओ केला ट्विट
मुंबई : भारतीय
संघाच्या भूमिकेला शिवसेना उबाठा गट खासदार संजय राऊतांनीच विरोध केला आहे. पाकिस्तानी
मंत्री तथा एसीसी अध्यक्ष मोहसीन नक्वीकडून चषक स्वीकारण्यास नकार देणाऱ्या टीम
इंडियावर खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे. राऊतांच्या या ट्विटर प्रतिक्रिया
देत नेटीझन्सनी त्यांचाही समाचार घेतला आहे.
संजय
राऊत आपल्या एक्स पोस्टवर म्हणतात की, “फक्त
१५ दिवसांपूर्वी जेव्हा आशिया कप मालिका सुरू झाली तेव्हा ते (टीम इंडिया) त्यात
नकवीशी हस्तांदोलन करत आहेत आणि आता सगळा देशभक्तीचा ड्रामा सुरू आहे.
जर तुमच्या
रक्तात खरच देशभक्ती होती तर मैदानावर खेळायला का उतरलात? वर पासून खालपर्यंत हा सगळा
ड्रामा सुरू आहे. जनताच तुमचा खेळ करेल”, अशी प्रतिक्रिया खासदार राऊतांनी ट्विटद्वारे दिली आहे.
खासदार
संजय राऊतांच्या या ट्विटनंतर क्रिकेट विश्वातील चाहत्यांनी संजय राऊतांवरच टीका
केली आहे. भारत मालिका जिंकला आणि त्यांनी पाकिस्तानला हार पत्करावी लागली याचे
दुःख तुम्हाला होत आहे का?, असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे.