विश्वास सामाजिक संस्थेतर्फे मराठमोळ्या परंपरेतील महाभोंडला; संजय वाघुले, वृषाली वाघुले यांच्या नेतृत्वाखाली आयोजन
29-Sep-2025
Total Views |
ठाणे : विश्वास सामाजिक संस्थेतर्फे नवरात्रौत्सवानिमित्ताने आयोजित केलेल्या मराठमोळी परंपरा असलेल्या महाभोंडल्याला नारी शक्तीचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नव्या पिढीला समृद्ध मराठी संस्कृतीची ओळख करुन देण्याबरोबरच मराठी परंपरा वृद्धींगत करण्यासाठी हा उपक्रम यशस्वी ठरला.
भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले व भाजपाच्या नौपाडा मंडल अध्यक्षा वृषाली वाघुले यांनी नौपाड्यातील उमा निळकंठ व्यायामशाळेच्या सभागृहात रविवारी महाभोंडल्याचे आयोजन केले होते. २३ व्या वर्षी साजरा झालेला महाभोंडल्यात सहभागी होण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. त्यात तरुणींची संख्या लक्षणीय होती. मुसळधार पावसामुळे मैदानाऐवजी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात महिलांचा उत्साह पाहावयास मिळाला.
ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे... एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू... अक्कण माती, चिक्कण माती अशा पारंपरिक गीतांच्या सुरात भोंडल्याचा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. नऊ वारी पैठणी साडी, नथ, पारंपरिक दागिने अशी वेशभूषा करीत २०० हून अधिक महिलांनी भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणत फेर धरला. अन्, पुढील दोन तासांत नवरात्रीतील मराठी संस्कृतीची झलक पाहावयास मिळाली.
प्रथम क्रमांकाच्या विजेतीला सोन्याची नथ, पैठणी देण्यात आली. तर इतर स्पर्धकांना साडी व गिफ्ट व्हाऊचर्स देण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी सई कारुळकर, वैशाली विधाते, संगीता भिसे, भाग्यश्री मुळे, रंजना भंडारे, कमल सावळे, पुजा सरोदे, भक्ती मोहिते, राणी क्षीरसागर, मधुरा जोगळेकर, प्रिया शुक्ला, भाजपाचे नौपाडा मंडल अध्यक्ष रोहित गोसावी, अमित वाघचौरे, प्रशांत कळंबटे, समीर साठे, विकास म्हस्के, शरीफ खान, हनिफ खान, ज्ञानेश्वर अंदुरे, राजेश जाधव, योगेश गांगुर्डे, अक्षय लोखंडे, जगदीश मोहिते, मनोज शुक्ला यांनी मेहनत घेतली.
स्पर्धेचा निकाल
महाभोंडलामध्ये विविध गटात स्पर्धा झाली. त्यात सात ते १५ वयोगटात प्रथम क्रमांक अनन्या राजेश ठाकरे हिने मिळविला. तर अनघा चोरगेने द्वीतीय, धनश्री कडवने तृतीय आणि देवांशी राजेश पवार हिला चतुर्थ क्रमांक मिळाला. १६ ते २५ वयोगटात आर्या चोरगे सर्वोत्कृष्ट ठरली. तर द्वीतीय क्रमांकावर अन्वयी म्हसे, तृतीय क्रमांकावर आर्या झावडे आणि चतुर्थ क्रमांकावर निधी कोळी यांची निवड झाली. २५ ते ५० वयोगटात यंदा वर्षा सावंत यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तर त्यापाठोपाठ सुजाता तोडकर, सायली कोळी, दीप्ती दुधाणे यांनी लक्षवेधी कामगिरी केली.